ETV Bharat / entertainment

तृप्ती डिमरीच्या बर्थडे पोस्टने सॅम मर्चंटसोबत डेटिंगच्या अफवांना पुन्हा उजाळा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 12:59 PM IST

Triptii Dimri Birthday Post : तृप्ती दिमरीच्या वाढदिवसाच्या पोस्टने तिचा कथित प्रियकर सॅम मर्चंटसोबतच्या डेटिंगच्या अफवांना पुन्हा उजाळा मिळाला आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटाचे यश साजरे करणाऱ्या तृप्तीची रंजक पोस्ट पाहण्यासाठी बातमी वाचा.

Triptii Dimri Birthday Post
तृप्ती डिमरीची बर्थडे पोस्ट

मुंबई - Triptii Dimri Birthday Post : 'अ‍ॅनिमल' चित्रपटातील बोल्ड भूमिकेमुळे अभिनेत्री तृप्ती दिमरी खूप चर्चेत आली होती. तृप्तीने डिसेंबर 2023 मध्ये हॉटेल व्यवसायिक सॅम मर्चंटशी रोमँटिक संबंध जोडल्याच्या अफवा उठल्या होत्या. आता तिने सॅमवर वाढदिवसाच्या प्रेमाचा वर्षाव करतानाचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Triptii Dimri Birthday Post
तृप्ती डिमरीची बर्थडे पोस्ट

'अ‍ॅनिमल' चित्रपटाच्या यशाने उंच भरारी घेत असलेल्या तृप्ती दिमरीने अलीकडेच तिच्या कथित बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्ट केल्या. 2017 च्या थ्रोबॅक इमेजसह तिने 2023 मधील काही लेटेस्ट फोटोही यामध्ये पोस्ट केले आहेत. सॅमला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, तृप्तीने एक कोलाज इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे. यातील एका फोटोत तृप्ती दिमरी आनंद व्यक्त करते आहे तर सॅम कॅमेरासाठी पोझ देताना दिसतो.

या फोटोत तृप्ती काळ्या रंगाच्या पोशाखात चमकत आहे, तर सॅमने स्लीक ब्लॅक शर्ट घातलेला आहे. दुसऱ्या एका फोटोत 2023 मधील एक क्षण कॅप्चर झाला आहे. यामध्ये दोघेही हेल्मेट घालून दुचाकी चालवण्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. यामध्ये ती बिनधास्तपणे स्ट्रीट फूडचा आनंद घेताना दिसत आहे.

तृप्तीचा कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंट हा कॅसा वॉटर्स आणि अ‍ॅव्होर गोवाचा संस्थापक आहे. त्याला इन्स्टाग्रामवर फोर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स लाभले असून तो अनेकांचे प्रेरणास्थानही आहे. त्याचे बायो मॉडेलिंग ते गोव्यात लक्झरी निवासस्थान आणि बीच क्लब स्थापन करण्यापर्यंतचा प्रवास, ट्रॅव्हल ब्लॉगर म्हणून तो करत असलेलं सर्जनशील कामाचे लोक चाहते बनले आहेत.

तृप्ती दिमरी आणि सॅम मर्चंटशी संबंध असल्याच्या चर्चा रंगण्यापूर्वी तिचे नाव अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मासोबत जोडले गेले होते. ते रिलेशनशिपमध्ये असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, गेल्या जूनमध्ये चाहत्यांच्या लक्षात आले की त्यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. तेव्हा त्यांच्या ब्रेकअपबद्दल चर्चेलाही उधाण आले होते.

वर्क फ्रंटवर, तृप्ती दिमरी दिग्दर्शक आनंद तिवारीच्या 'मेरे मेहबूब मेरे सनम'मध्ये विकी कौशलसोबत काम करणार आहे. याव्यतिरिक्त, ती राज शांडिल्याच्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ'मध्ये दिसणार आहे. अनुराग बसूच्या 'आशिकी 3' मध्ये कार्तिक आर्यनच्या विरुद्ध भूमिका करण्यासाठी तृप्तीला देखील कास्ट केले आहे.

हेही वाचा -

  1. धर्मेंद्रसोबतच्या किंसिंग सीनमुळे तब्बूनं उडवली शबाना आझमीची खिल्ली
  2. 'फायटर'साठी हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणने घेतली मोठी रक्कम
  3. जंगी स्वागतानंतर घरी परतलेल्या मुनावर फारुकीच्या मुलांनं केलं बाबाचं कौतुक
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.