महाराष्ट्र

maharashtra

पुष्कर जोगचा स्कॅाटलॅंडमध्ये शूटिंग सुरू असताना अपघात, पाहा व्हिडिओ - Pushkar Jog

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 3:51 PM IST

अभिनेता पुष्कर जोग 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाचं स्कॅाटलॅंडमध्ये शूटिंग सुरु असताना एका सीनच्यावेळी गंभीर जखमी झाला आहे. धवत पाठलाग करण्याचा सीन शूट होत असताना त्याचा बॅलन्स गेला आणि तो गुडघ्यावर पडला. यामध्ये त्याच्या गुडघ्याला आणि हाताला जबर मार बसला आहे.

Pushkar Jog
पुष्कर जोग

मुंबई - अभिनेता पुष्कर जोगनं काही दिवसांपूर्वी 'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा केली होती होती. एआयवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचं स्कॅाटलॅंडमध्ये शूटिंग सुरु असताना अ‍ॅक्शन सीन करताना झालेल्या अपघातात अभिनेता पुष्कर जोग याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात त्याच्या गुडघ्याला आणि हाताला जबर मार बसला आहे. दरम्यान, पुष्कर जोग मुंबईत दाखल झाला असून लवकरच तो या चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात करणार असल्याचं समजतं.

पुष्कर जोगचा स्कॅाटलॅंडमध्ये शूटिंग सुरू असताना अपघात

अभिनेता आणि दिग्दर्शक अशी ओळख असलेला पुष्कर जोग व्हिक्टोरिया, बाप माणूस आणि मुसाफिरा या चित्रपटानंतर तो आता 'धर्मा- दि एआय स्टोरी' चित्रपटाचं शूटिंग करत आहे. हा चित्रपटही बाप आणि लेकीचं नातं अधोरेखीत करणारा आहे. "लाईट्स कॅमेरा अँड आणि AI च्या जंजाळात आपल्या मुलीच्या शोधात एका बापाचा प्रवास..." अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे.

अलिकडेच पुष्कर जोगची भूमिका असलेला 'बाप माणूस' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये सिंगल पेरेंट असलेल्या बापाची आणि मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. आपल्या मुलीच्या संगोपनात तो सर्वस्व पणाला लावून लेकीची काळजी घेत असतो. तिला आईच्या प्रेमाची उणीव भासू नये यासाठी तो सतत प्रयत्न करतो. एका भावनिक आणि गुंतागुंतीच्या विषयाला प्रथितयश दिग्दर्शक योगेश फुलफगर यांनी हात घातल्याचं या चित्रपटात दिसलं. यातील पुष्करच्या भूमिकेचंही खूप कौतुक झालं.

'धर्मा- दि एआय स्टोरी' या चित्रपटात अभिनय करण्याबरोबरच पुष्कर या चित्रपटाचं दिग्दर्शनही करत आहे. यामध्ये त्याच्यासह दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर काम करत आहेत. पल्लवी वैद्य यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून या पुष्करसाठी हा खूप महत्त्वकांक्षी चित्रपट आहे.

हेही वाचा -

  1. न्यासा देवगणच्या वाढदिवशी काजोलनं शेअर केले हृदयस्पर्शी क्षण - Nysa Devgan birthday
  2. Salman Khan : सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमधून लॉरेन्स बिश्नोईच्या नावे कॅब बुक करणाऱ्या तरुणाला अटक - Salman Khan
  3. राजकुमार राव यांनी प्लास्टिक सर्जरीच्या अफवांवर मौन सोडले, केला 'या' गोष्टीचा खुलासा - Rajkummar Rao

ABOUT THE AUTHOR

...view details