ETV Bharat / entertainment

न्यासा देवगणच्या वाढदिवशी काजोलनं शेअर केले हृदयस्पर्शी क्षण - Nysa Devgan birthday

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 12:19 PM IST

Nysa Devgan birthday : काजोलची मुलगी न्यासा देवगन शनिवारी २१ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्तानं काजोलनं आपलं प्रेम व्यक्त करत प्रिय मुलीच्या न पाहिलेल्या फोटोंची स्ट्रिंग शेअर केली आहे.

Nysa Devgan birthday
न्यासा देवगण २१ वा वाढदिवस

मुंबई - Nysa Devgan birthday : बॉलिवूडचे लोकप्रिय जोडपं काजोल आणि अजय देवगण यांच्यासाठी आजचा दिवस खास आहे. त्यांची मुलगी न्यासा देवगण हिचा शनिवारी 21 वा वाढदिवस आहे. आपली अभिनय कारकिर्द सांभाळून मुलांसाठी पूर्णवेळ आईच्या भूमिकेत काजोल नेहमी वावरत असते.

एक समर्पित आई आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ती सोशल मीडियावर तिच्या आयुष्याची आणि मुलांची झलक शेअर करत असते. ही प्रथा कायम राखत तिनं मुलीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे. 19 एप्रिल रोजी काजोलनं तिच्या मुलीसाठी वाढदिवसापूर्वी शुभेच्छा शेअर केल्या आणि 20 एप्रिल रोजी तिनं न्यासाचे पूर्वी कधीही न पाहिलेले फोटो शेअर केलेत.

पहिल्या फोटोमध्ये न्यासा जमिनीवर पडलेली दिसत असून तिच्या पोटावर पप्पी दिसत आहे. दुसऱ्या फोटोत ती सोनेरी लेहेंग्यात सुंदर दिसत आहे. यामध्ये ती झुल्यात बसून कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसतेय. वाढदिवसाच्या पोस्टमधील शेवटच्या फोटोत ती एका पिल्लासोबत खेळताना दिसते आणि तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर भाव आहेत. काजोलने फोटो शेअर केले आणि कमेंटमध्ये न्यासाला आयुष्यभर सदैवी आनंदी राहण्यासाठी आशीर्वाद दिला आहे.

न्यासाच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी, काजोलनं तिच्या मातृत्वाच्या प्रवासाबद्दल एक गोड पोस्ट शेअर केली होती. काजोलनं सोशल मीडियावर हिरवा पोशाख परिधान केलेल्या आणि आईच्या मांडीवर बसलेल्या छोट्या न्यासाचा थ्रोबॅक फोटो शेअर केला. फोटो शेअर करताना तिने न्यासावर किती प्रेम आहे याबद्दल एक लांब पोस्ट लिहिली आहे.

काजोलनं सुपरस्टार अजय देवगण याच्याबरोबर फेब्रुवारी 1999 मध्ये लग्न केलं होतं. या जोडप्याला न्यासा नावाची मुलगी आणि युग नावाचा मुलगा अशी दोन मुलं आहेत. कामाच्या आघाडीवर, काजोल अलीकडेच 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये देवयानी आणि 'द ट्रायल' या वेब सीरिजमध्ये नयोनिका सेनगुप्ताची भूमिका करताना दिसली. आगामी काळात तिच्या हातामध्ये 'सरजमीन', 'दो पट्टी' आणि 'मां' हे चित्रपट आहेत.

हेही वाचा -

  1. राजकुमार राव यांनी प्लास्टिक सर्जरीच्या अफवांवर मौन सोडले, केला 'या' गोष्टीचा खुलासा - Rajkummar Rao
  2. 'बजरंगी भाईजान 2' ची स्क्रिप्ट तयार, सलमान दुबईहून परतताच सुरू होईल तयारी - Bajrangi Bhaijaan 2
  3. Salman Khan : सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटमधून लॉरेन्स बिश्नोईच्या नावे कॅब बुक करणाऱ्या तरुणाला अटक - Salman Khan

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.