महाराष्ट्र

maharashtra

कमल सदनानं दिव्या भारतीच्या मृत्यूवर केला खुलासा, वाचा सविस्तर - divya bharti

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 13, 2024, 5:31 PM IST

Kamal Sadanah : दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल कमल सदनानं आता एक खुलासा केला आहे. याशिवाय त्यानं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील काही गोष्टी एका मुलाखतीदरम्यान सांगितल्या आहेत.

Kamal Sadanah
कमल सदना

मुंबई - Kamal Sadanah and Divya bharti :अभिनेत्री दिव्या भारती आणि अभिनेता कमल सदना स्टारर 'रंग' चित्रपट 90च्या दशकात खूप गाजला होता. दिव्या आज आपल्यात नसली तरी ती तिच्या चाहत्यांच्या मनावर आजही राज्य करते. दरम्यान आता कमलनं दिव्या भारतीच्या मृत्यूचं रहस्य उघड केलं आहे. सिद्धार्थ कन्ननबरोबर दिलेल्या एका मुलाखतीत कमल सदानानं आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्यानं दिव्या भारतीचा उल्लेख करताना म्हटलं, "तिच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं, तिच्याबरोबर काम करण्याचा अनुभव खूप छान होता. दिव्या अभिनेत्री श्रीदेवीची नक्कल करायची, तिच्या मृत्यूची बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती. या काळात मी तिच्याबरोबर काम करत होतो. मला असं वाटते की, दिव्यानं थोडी दारू पीली होती. ती त्यावेळी मजा- मस्ती करत होती आणि कदाचित ती यावेळीच घसरली असेल. मला वाटते की, हा एक अपघात आहे."

कमल सदाना दिव्या भारतीच्या मृत्यूबद्दल केला खुलासा :दरम्यान कमल त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही बोलला. त्यानं पुढं सांगितलं की, "माझा 20 वा वाढदिवस होता, माझे वडील ब्रिज यांनी मला, आई आणि बहिणीला गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वत: ला गोळी मारून घेतली." यामध्ये माझ कुटुंब संपलं. या अपघातात कमलच्या मानेला गोळी लागली आणि तो वाचला. मात्र या घटनेत त्याची आई, वडील आणि बहीणचा मृत्यू झाला. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी हा अपघात झाल्यानं, तो आजही आपला वाढदिवस साजरा करत नाही. कमलचा जन्म 21 ऑक्टोबर 1970 रोजी झाला असून आज तो 53 वर्षांचा आहे. ज्या घरात हा भीषण अपघात झाला तो तिथे आजही राहतो.

कमल सदाना बॉलिवूडमध्ये झाला सक्रिय : कमलचं बॉलिवूड करिअर 90च्या दशकात संपलं होतं. कमलनं 1992 मध्ये 'बेखुदी' या चित्रपटातून काजोलबरोबर डेब्यू केला होता. आता कमल सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय होताना दिसत आहे. तो शेवटी 'पिप्पा' चित्रपटामध्ये ईशान खट्टरबरोबर सॅम माणेकशॉ यांच्या भूमिकेत दिसला होता. 'पिप्पा' हा भारत आणि पाकिस्तान युद्धावर आधारित असून या चित्रपटात बांग्लादेशला कशाप्रकारे स्वातंत्र्य मिळालं हे दाखविण्यात आलं होतं. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

हेही वाचा :

  1. 'पुष्पा' समोर झुकला 'सिंघम'?, बदलली 'सिंघम अगेन'ची रिलीज तारीख, 'रूह बाबा'शी होऊ शकतो सामना - Singham Again release date
  2. विधू विनोद चोप्राच्या 'झिरो से रीस्टार्ट'चे काउंटडाऊन सुरू, उलगडणार '12th फेल'च्या पडद्या मागची गोष्ट - Zero Se Restart
  3. "कोणाच्याही बापाची फिल्म इंडस्ट्री नाही", नेपोटिझमवर विद्या बालनचं स्पष्ट उत्तर - Actress vidya balan

ABOUT THE AUTHOR

...view details