महाराष्ट्र

maharashtra

करीना, क्रिती, तब्बूच्या 'क्रू'ची उंच भरारी, तीन दिवसांत 30 कोटींची कमाई - Crew Box Office Day 3

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 1, 2024, 2:15 PM IST

Updated : Apr 1, 2024, 2:42 PM IST

Crew Box Office Day 3: करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'क्रू' चित्रपटामध्ये तिघींनी एअर होस्टेसच्या भूमिका साकारल्या आहेत. या हिस्ट कॉमेडीने बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवशी वेग घेतला आणि 30 कोटींचा आकडा गाठला.

Crew Box Office Day 3
क्रू 3 दिवसांची बॉक्स ऑफिस कमाई

मुंबई - Crew Box Office Day 3: राजेश ए. कृष्णन यांनी दिग्दर्शित केलेला 'क्रू' चित्रपट 29 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. पॉवरहाऊस कलाकार करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन या तीन अभिनेत्री या हिस्ट कॉमेडीच्या मुख्य स्टार आहेत. चित्रपटानं बॉक्स ऑफिसच्या अंदाजांना मागे टाकलं आणि हा महिला केंद्रीत चित्रपट कोविड महामारीनंतरचा सर्वात मोठा ओपनिंग देणारा चित्रपट म्हणून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या दिवशी, चित्रपटानं दोन आकड्यांमध्ये कमाई केली आणि तीन दिवसांत सुमारे 30 कोटींची कमाई केली.

भारतात पहिल्या दिवशी 9.25 कोटी रुपयांसह उत्कृष्ट कमाई करणाऱ्या या चित्रपटानं शनिवारी तब्बल 9.75 कोटी रुपयांची कमाई केली आणि रविवारीही चांगली कमाई केली. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने अहवाल दिला आहे की 'क्रू' चित्रपटानं तिसऱ्या दिवशी 10.25 कोटी रुपये कमावले.या चित्रपटानं प्रदर्शनानंतरच्या पहिल्या विकेंडला 29.25 कोटी रुपयांची नजरेत भरणारी कमाई केली आहे.

'क्रू' चित्रपटात तीन स्त्रीयांचं साहस पाहायला मिळतं. संघर्षग्रस्त एअरलाइन उद्योगाच्या पार्श्वभूमीवर बनवलेला हा धमाल मजा मस्तीचा चित्रपट तीन एअर होस्टेसवर केंद्रित आहे. विमानाच्या क्रू मेंबर म्हणून काम करताना छोट्या चोऱ्या गंमत म्हणून करणाऱ्या या तिघीजणी एका स्वतःच निर्माण केलेल्या जाळ्यात अनपेक्षितपणे अडकतात, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतो. त्यांना एका मृत प्रवाशाच्या शर्टच्या खाली सोन्याची बिस्किटे लपवल्याचं आढळतं आणि पुढं अनेक धमाके होतात. तीन आघाडीच्या अभिनेत्रींव्यतिरिक्त या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा या महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत.

'क्रू' चित्रपट भारतात 2000 थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. याशिवाय 75 पेक्षा जास्त राष्ट्रांमध्ये 1100 हून अधिक ठिकाणी चित्रपटानं पदार्पण केलंय. या चित्रपटाची निर्मिती आणि प्रमोशनचा खर्च मिळून सुमारे 60 कोटी बजेट लागल्याचं सांगण्यात येतं. अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन्स नेटवर्क आणि बालाजी टेलिफिल्म्स यांनी याची निर्मिती केली आहे.

हेही वाचा -

  1. अजय देवगण आणि आर माधवन अभिनीत चित्रपट 'शैतान' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - shaitaan Movie
  2. अमिताभ बच्चनला आठवला धोकादायक स्टंट्स, ना सुरक्षा कवच ना व्हिएफएक्स - Amitabh Bachchan dangerous stunts
  3. अभिनेत्री आलिया भट्टनं करीना कपूर स्टारर 'क्रू' चित्रपटाचा दिला रिव्ह्यू , केली पोस्ट शेअर - alia bhatt
Last Updated :Apr 1, 2024, 2:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details