ETV Bharat / entertainment

अभिनेत्री आलिया भट्टनं करीना कपूर स्टारर 'क्रू' चित्रपटाचा दिला रिव्ह्यू , केली पोस्ट शेअर - alia bhatt

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 6:26 PM IST

Alia bhatt : आलिया भट्टनं करीना कपूर अभिनीत 'क्रू' चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Alia bhatt
आलिया भट्ट

मुंबई Alia bhatt : सध्या अभिनेत्री करीना कपूर तिच्या 'क्रू' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर क्रिती सेनॉन आणि तब्बू देखील मुख्य भूमिकेत आहेत. या तिघांचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला आहे. याशिवाय या चित्रपटाची कहाणी खूप सुंदर आहे. अवघ्या दोन दिवसात या चित्रपटानं कोटींचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला आहे. सर्वसामान्यांबरोबर बॉलिवूड स्टार्सही या चित्रपटाला पसंती देत आहेत. आता यापैकी एक नाव आलिया भट्ट हिचं देखील आहे. आलियानं नुकताच करीना कपूर स्टारर 'क्रू' चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर तिनं चित्रपटाबद्दल रिव्ह्यू दिला आहे.

Alia bhatt
आलिया भट्ट

आलियाला 'क्रू' चित्रपट पसंत पडला : आलियाला करीनाचा चित्रपट खूप आवडला आहे. तिनं अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर 'क्रू'चा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना आलियानं या पोस्टवर लिहिलं, 'क्रू'नं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. पडद्यावरील आणि बाहेरच्या सर्व सुंदर महिलांचे अभिनंदन.'' आलियानं ही पोस्ट एकता कपूर, रिया कपूर, करीना, तब्बू आणि क्रितीलाही टॅग केली आहे. आलियाच्या या पोस्टवरुन स्पष्ट होते की तिला करीनाचा चित्रपट खूप मनोरंजक वाटला असेल. आता आलियाची ही पोस्ट चर्चेत आहे.

'क्रू'ची स्टार कास्ट : करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन व्यतिरिक्त 'क्रू'मध्ये दिलजीत दोसांझ, कॉमेडियन कपिल शर्मा, सास्वता चॅटर्जी, राजेश शर्मा आणि कुलभूषण खरबंदा हे कलाकार दिसले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केले आहे. हा चित्रपट बालाजी टेलिफिल्म्स आणि अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन्स नेटवर्कच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. 'क्रू' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या चित्रपटानं फक्त दोन दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 20 कोटींहून अधिक कमाई केली आहे. करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलयाचं झालं तर, ती पुढं 'वीरे दी वेडिंग 2','सिंघम अगेन' आणि 'तख्त'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. जॅकलीन फर्नांडिसनं एक फोटो शेअर करुन चाहत्यांना इस्टरच्या दिल्या शुभेच्छा - Jacquelien Fernandez
  2. रणदीप हुड्डानं अमेरिकेच्या 'ओपेनहाइमर' चित्रपटावर केली टीका - Randeep Hooda
  3. करण जोहरच्या 'द बुल' चित्रपटाची शूटिंग डेट न ठरल्यानं सलमान खाननं घेतला मोठा निर्णय - salman khan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.