महाराष्ट्र

maharashtra

आशुतोष राणानं उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिराला दिली भेट, व्हिडिओ व्हायरल - ashutosh rana

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 4, 2024, 6:15 PM IST

Ashutosh rana : आशुतोष राणा उज्जैनमध्ये श्री महाकालेश्वर मंदिरात पोहचला. यावेळी त्यानं बाबा भोलेनाथांची पूजा केली आणि भस्म आरतीमध्ये देखील भाग घेतला.

Ashutosh rana
आशुतोष राणा

उज्जैन - Ashutosh rana :हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता आशुतोष राणा गुरुवारी 4 एप्रिल रोजी सकाळी मध्य प्रदेशातील उज्जैन येथे पोहोचला, जिथे त्यानं श्री महाकालेश्वर मंदिरात बाबा भोलेनाथांची पूजा केली आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आशुतोष हा पांढऱ्या कुर्ता पायजमा आणि काळ्या रंगाच्या नेहरू जॅकेटमध्ये दिसत आहे. यावेळी त्यानं भस्म आरतीमध्ये देखील भाग घेतला होता. भस्म आरतीनंतर आशुतोषनं मंदिराच्या गर्भगृहाच्या उंबरठ्यावर बसून मन मन चिंतन केलं. मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितल्यानुसार, ब्रह्म मुहूर्तावर बाबा महाकालचे दरवाजे उघडण्यात आले होते.

महाकालेश्वर मंदिरात 'या' सेलिब्रिटींनी लावली होती हजेरी : त्यानंतर भगवान महाकाल यांचा दूध, दही, तूप, साखर, मध यासह पंचामृतानं अभिषेक करण्यात आला. ढोल आणि शंखांच्या गजरात भस्म आरती करण्यात आली. याआधी महाकालेश्वर मंदिरात अनेक सेलिब्रिटींनी दर्शनासाठी हजेरी लावली आहे. यामध्ये अनुष्का शर्मा, विराट कोहली, अथिया शेट्टी, केएल राहुल, सारा अली खान, गोविन्दा, आयुष्मान खुराना, प्रिंस नरूला, रुपाली गांगुली, सुनील शेट्टी, अहान शेट्टी , जैकी श्रॉफ, हेमा मालिनी, अजय देवगण, अक्षय कुमार, सोनू सूद आणि इतर प्रसिद्धी व्यक्तीचा समावेश आहे. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे.

आशुतोष राणाचं वर्कफ्रंट :आशुतोष राणा 'दुश्मन' आणि 'संघर्ष' यांसारख्या चित्रपटातील भूमिकांसाठी प्रसिद्ध असून त्यानं 'पठाण', 'वॉर', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'धडक', 'सिम्बा' आणि 'राझ' यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तो पुढे दिग्दर्शक यान मुखर्जीच्या ॲक्शन थ्रिलर 'वॉर 2' मध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये हृतिक रोशन आणि एनटीआर ज्युनियर देखील मुख्य भूमिकेत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित, 'वॉर 2' चित्रपट 2025 च्या स्वातंत्र्यदिनी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तो 'गँग्स ऑफ गाझियाबाद'मध्ये शत्रुघ्न सिन्हा आणि सनी लिओनीबरोबर दिसणार आहे. सध्या हा चित्रपट खूप चर्चेत आहे.

हेही वाचा :

  1. आशिष विद्यार्थीनं घेतला डॉलीच्या टपरीवरील जगप्रसिद्ध चहाचा स्वाद, व्हिडिओ व्हायरल - Ashish Vidyarthi
  2. 'मी जिंवत असतपर्यत श्रीदेवीचा बायोपिक बनू देणार नाही', बोनी कपूरचा निर्धार - SRIDEVI BIOPIC
  3. 'मैदान' चित्रपटाला सेन्सॉरचा हिरवा कंदील, 'यूए' प्रमाणपत्रासह रिलीजचं मैदान मोकळं - maidaan Movie

ABOUT THE AUTHOR

...view details