महाराष्ट्र

maharashtra

जेईई-मेन परीक्षेचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील तब्बल 'इतक्या' विद्यार्थ्यांनी मिळवले 100 गुण - JEE Main Results

By PTI

Published : Apr 25, 2024, 8:00 AM IST

JEE Main Results : जेईई मेन परीक्षेचा निकाल एनटीएनं जाहीर केला. या परीक्षेत तब्बल 56 विद्यार्थ्यांनी 100 पैकी गुण मिळवले आहेत. तर एनटीएनं 39 विद्यार्थ्यांवर गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

JEE Main Results
संपादित छायाचित्र

नवी दिल्ली JEE Main Results : नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं बुधवारी जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत तब्बल 56 विद्यार्थ्यांनी 100 गुण मिळवले आहेत, अशी घोषणा एनटीएनं केली. त्यासह या परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं 39 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. या 39 विद्यार्थ्यांना आता तीन वर्षासाठी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेला बसता येणार नाही, असंही एनटीएनं जाहीर केलं.

महाराष्ट्रातील 'इतक्या' विद्यार्थ्यांना मिळाले 100 गुण :जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत 10 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात 56 विद्यार्थ्यांनी तब्बल 100 गुण मिळवले आहेत. त्यातील तेलंगाणा राज्यातील 15, आंध्रप्रदेश 7 आणि महाराष्ट्र 7, दिल्ली 6 आदी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत 100 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं मोठं कौतुक करण्यात येत आहे. जेईई-मेन या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेत मिळवलेले गुण हे बहुसत्र पेपर्समध्ये मिळवलेले असतात. प्राप्त गुण विद्यार्थ्यांच्या प्रत्येक सत्रासाठी 100 ते 0 गुणांच्या स्केलमध्ये रुपांतरीत करण्यात येतात, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या एका अधिकाऱ्यानं दिली.

इतक्या भाषेमधून झाली जेईई-मेन परीक्षा :एनटीएकडून घेण्यात आलेली जेईई-मेन अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा अनेक भाषात घेण्यात येते. यात आसामी, बंगाली, इंग्रजी, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तामिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे. जेईई मेन अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा आता भारताबाहेर घेण्यात येते. यात दोहा, दुबई, काठमांडू, मस्कत, रियाध, शारजा, सिंगापूर, कुवेत सिटी, क्वालालंपूर, लागोस, कोलंबो, जकार्ता, मॉस्को, ओटावा, पोर्ट लुईस, बँकॉक, वॉशिंग्टन डीसी, अबूधाबी इथही आयोजित करण्यात आली होती. अभियांत्रिकी प्रवेश पूर्वपरीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली होती. तर मेन परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात आली. जेईई मेन पेपर 1 आणि पेपर 2 च्या निकालावरुन आता विद्यार्थ्यांना JEE Advanced परीक्षेसाठी निवडण्यात आलं आहे. ही परीक्षा 23 भारतीय तंत्रज्ञान संस्था (IITs) मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी महत्वाची परीक्षा आहे.

हेही वाचा :

  1. जेईई'च्या निकालानंतर मुलगा बेपत्ता! संपर्क होत नसल्यानं आईची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट
  2. कोचिंग सेंटरच्या 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; शिकवणी वर्गात 500 विद्यार्थी घेत होते NEET, JEE ची शिकवणी - Students Suffer Food Poison
  3. 'मम्मी-पप्पा, मी जेईई करू शकत नाही, मला माफ करा'; परीक्षेच्या आधी कोटामध्ये 18 वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details