ETV Bharat / state

जेईई'च्या निकालानंतर मुलगा बेपत्ता! संपर्क होत नसल्यानं आईची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 8:43 PM IST

जेईईचा (JEE) निकाल लागल्यानंतर मुंबईत मुलगा बेपत्ता झाल्याची घटना घडली. त्यानंतर घरच्यांचा संपर्क होत नव्हता. पोलिसांनी काही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मुलाच्या आईनं इन्स्टाग्रामवर मोठी भावनिक पोस्ट करत आपल्या मुलाला परत येण्याची हाक दिली आहे.

17-year-old son goes missing from Mumbai after JEE result
बेपत्ता मुलाची आई

मुंबई : मुंबईमध्ये 13 फेब्रुवारीला 17 वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला आहे. मुलगा जेईईचा (JEE) निकाल लागल्यानंतर म्हणजे 13 फेब्रुवारीला बेपत्ता झाला . त्यादिवशी नक्की काय घडलं हे त्याच्या आईने इन्स्टाग्रावमर पोस्ट करत सविस्तर सांगितलं आहे. "काय झालं ते मला अजूनही कळलं नाही. कुठं चूक झाली हे मला माहीत नाही. मला एवढंच माहीत आहे की, माझा 17 वर्षांचा मुलगा 13 फेब्रुवारीपासून बेपत्ता आहे", अशी पोस्ट आहे.

काय आहे पोस्टमध्ये : "इतर दिवसांसारखाच तो दिवस होता. मी सकाळी माझ्या खोलीतून बाहेर आले. उत्कर्ष त्याचा लॅपटॉप घेऊन बसला होता. त्या दिवशी त्याचा जेईईचा निकाल लागला होता. मी पूजा करत असताना तो म्हणाला, आई, मला 69 पर्सेन्टाइल मिळाले. मार्क तर चागंले होते. पण मला त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. मला त्याच्याशी बोलायचं होतं. पण आम्हा दोघांना काम करायचं होतं. म्हणून मी विचार केला, ‘मी त्याच्याशी संध्याकाळी बोलेन.’ पण ती संधी आली नाही. दररोज तो कोचिंगवरून दुपारी 2 वाजता घरी यायचा. पण त्यादिवशी 3 वाजूननही तो आला नाही. त्याचा फोन घरीच होत. हे पाहून मी घाबरले. माझे पती सैन्यात आहेत. मी त्यांना सगळं सांगितलं. ते म्हणाले, 'येईल तो घरी'. पण माझा उत्कर्ष तसा नाही. पण तो काहीही न सांगता गेला. त्यामुळे मी सुरक्षा कर्मचाऱ्यांची मदत घेतली आणि सीसीटीव्ही फुटेज तपासलं. तिथं मी त्याला कॅन्टोन्मेंट परिसरामधून बाहेर जाताना पहिलं. त्याने काळे आणि लाल रंगाचं जॅकेट घातलं होतं. त्याच्यासोबत जांभळ्या रंगाची बॅग होती. मग मी कोचिंग सेंटरला फोन केला. ते म्हणाले, 'तो आज आला नाही.' मग मी खूप घाबरले. मी लगेच एफआयआर दाखल केला."

तो कुठे आहे हेही त्यांना माहीत नाही : "दुसऱ्या दिवशी, पोलिसांनी फोन करून माहिती दिली की, त्यांनी उत्कर्षला भोपाळच्या रेल्वे स्टेशनवर पाहिलं. 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.30 ची ट्रेन त्यानं मुंबईला जाण्यासाठी पकडली होती. फुटेजमध्ये तो कुठे जात आहे, हे कळत नव्हतं. पोलिसांनी मला विचारले, 'उत्कर्ष काळजीत होता का?' त्याची परीक्षा असून त्याला काळजी नव्हती. पोलिसांनी त्याचा फोन तपासला - काहीही नव्हतं. तेव्हा पोलीस म्हणाले, 'तुमचा मुलगा पळून गेला. पण कसं? त्याच्या सर्व वस्तू येथे आहेत. त्याचा फोन, चार्जर, कपडे जागेवर आहे. आम्ही आमच्या मुंबईतील सर्व नातेवाईकांना कळवलं आहे. आम्ही मुंबई पोलिसांच्या संपर्कात आहोत. परवा, त्यांना उत्कर्ष मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकावरून सकाळी 5:00 वाजता निघतानाचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं. पण तो कुठे आहे? हेही त्यांना माहीत नाही."

आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही : "प्रत्येकजण मला विचारत आहे, 'काही झालं होतं का?' पण मला काही कळले असते, तर मी माझ्या मुलाला जाऊ दिले नसते. उत्कर्ष, जर तू हे वाचत असशील तर प्लिज घरी परत ये. आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तोपर्यंत मी तुझ्या आवडीचा गाजराचा हलवा बनवते." अशी सविस्तर आणि तितकीच भावनिक पोस्ट उत्कर्षच्या आईने केली आहे. यामध्ये त्यांची मुलाबद्दलची मोठी काळजी दिसून येत आहे.

हेही वाचा :

1 शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू, शाळा प्रशासनावर कारवाईची पालकाकडून मागणी

2 बारामतीत 'नणंद विरुद्ध भावजय' लढत? सुनेत्रा पवारांचा प्रचाराचा रथही तयार, फक्त उमेदवारीची घोषणा बाकी

3 परवानगी द्या, शिवजयंतीपासून आम्ही शिवप्रेमी स्मारकाचं काम हाती घेऊ- विनोद पाटील यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.