महाराष्ट्र

maharashtra

नफे सिंह राठी खून प्रकरण: गोव्यातून दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 9:21 AM IST

Nafe Singh Rathee Murder Case Update : हरियाणा इंडियन नॅशनल लोक दल (INLD)चे अध्यक्ष नफे सिंह राठी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलीस पथकाला मोठं यश मिळालंय. दिल्ली पोलीस आणि हरियाणा एसटीएफ टीमनं गोव्यातून नफे सिंह राठी हत्याकांडप्रकरणी दोन शूटरला अटक केलीय.

नफे सिंह राठी खून प्रकरण: गोव्यातून दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश
नफे सिंह राठी खून प्रकरण: गोव्यातून दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश

चंदीगड Nafe Singh Rathee Murder Case : हरियाणा इंडियन नॅशनल लोक दलाचे (INLD) प्रदेशाध्यक्ष नफे सिंह राठी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालंय. झज्जर पोलीस, दिल्ली पोलीस स्पेशल सेल आणि हरियाणा एसटीएफ यांच्या संयुक्त कारवाईत हे यश मिळालंय. आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंह राठी यांच्या हत्येप्रकरणी पोलीस पथकानं सौरव आणि आशिष या दोन आरोपींना गोव्यातून अटक केलीय.

नफे सिंग राठी हत्येप्रकरणी गोव्यातून दघांना अटक :याप्रकरणी पोलिसांनी दोघांना गोव्यातून अटक केलीय. यासोबतच इतर दोघांना अटक करण्यासाठी पोलीस पथक वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांचं पथक आज दुपारपर्यंत अटक केलेल्या दोन्ही आरोपींना घेऊन दिल्लीत पोहोचू शकते. याप्रकरणी दिल्ली किंवा झज्जरमध्ये पोलिसांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे.

नफे सिंह राठी हत्येप्रकरणी वापरलेली कार जप्त : नफे सिंह राठी हत्याकांडात वापरलेली कारही पोलिसांनी जप्त केलीय. रेवाडी जंक्शनच्या कार पार्किंगमधून ही कार जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. झज्जरचे एसपी अर्पित जैन यांनी याला दुजोरा देताना सांगितलं की, "गाडी ज्या प्रकारे रेल्वे पार्किंगमध्ये उभी करण्यात आली होती, त्यावरुन आरोपी रेल्वेत चढून तिथून पळून गेल्याचं पोलिसांना वाटतं."

25 फेब्रुवारीला नाफे सिंह राठी यांची हत्या : रविवार 25 फेब्रुवारीला हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यातील बहादुरगढमध्ये शुटरनं 40-50 गोळ्या झाडून INLD प्रदेशाध्यक्ष नफे सिंह राठी यांची हत्या केली होती. या घटनेत नफे सिंग राठी यांचा सुरक्षा रक्षकही ठार झाला. तर चालक गोळीबारात जखमी झाला. नफे सिंहच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार त्यांना सतत धमक्या येत होत्या. शेवटी हल्लेखोरांनी नाफे सिंह यांची हत्या केली.

हेही वाचा :

  1. हरियाणा INLD चे अध्यक्ष नफे सिंह राठी यांची गोळ्या झाडून हत्या
  2. तिहेरी हत्याकांडानं चंद्रपूर हादरलं; नराधमानं पत्नीसह केली दोन मुलींची हत्या
  3. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग; मेळघाटात दारुड्या मुलानं केली आईची हत्या

ABOUT THE AUTHOR

...view details