महाराष्ट्र

maharashtra

अखेर भारत जोडो न्याय यात्रेत अखिलेश यादव सहभागी! म्हणाले, "भाजपा हटवा देश वाचवा"

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 6:03 PM IST

Akhilesh Yadav join Bharat Jodo Nyay Yatra : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री सपा प्रमुख अखिलेश यादव आज आग्रा येथे भारत जोडो न्याय यात्रेत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्यासोबत सहभागी झाले. यावेळी, "देशात द्वेषाचा बाजार उघडा आहे. या देशात गरिबांवर अन्याय होत आहे, म्हणून आम्ही आता सर्व सोबत लढत आहोत,ठ असं मत अखिलेश यादव यांनी व्यक्त केलं.

Akhilesh Yadav join Bharat Jodo Nyay Yatra
अखेर भारत जोडो न्याय यात्रेत अखिलेश यादव सहभागी

आग्रा (उत्तर प्रदेश) :Akhilesh Yadav join Bharat Jodo Nyay Yatra : समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आज रविवार (दि. 25 फेब्रुवारी) रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाले. आज ही यात्रा आग्रा येथे पोहचल्यांनतर अखिलेश यादव तेथे आले आणि त्यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह यात्रेत सहभाग नोंदवला. यावेळी दोन्ही नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत आम्ही एकत्र आहोत असा संदेश दिला.

भाजपाचा 80 लोकसभा जागांवर पराभव होईल : "राहुल गांधी यांची भाषा देशात प्रेम वाढवण्याची आहे. ते जसं बोलतायेत तसंच हे उत्तर प्रदेश राज्य पूर्णपणे प्रेमाचं शहर आहे. आमचा खरा लढा संविधान वाचवा, भाजपा हटवा आणि देश वाचवा यासाठी आहे. तसंच, आमचा लढा तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा उत्तर प्रदेशात भाजपाचा 80 लोकसभा जागांवर पराभव होईल." यावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधीही मंचावर उपस्थित होत्या.

देशात द्वेषाचा बाजार उघडला : काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, गर्दीतून एक मुलगा माझ्याकडे आला आणि म्हणाला की "तुम्ही काय करत आहात हे मला माहीत आहे." मी काय करतोय असं विचारल्यावर तो म्हणाला की, "द्वेषाच्या बाजारात तुम्ही प्रेमाचं दुकान उघडत आहात. आज देशात द्वेषाचा बाजार उघडला आहे. या देशात गरिबांवर अन्याय होत आहे, म्हणून आम्ही या यात्रेला न्याय असाही शब्द दिला आहे," असंही राहुल गांधी यावेळी म्हणालेत.

सर्व मिळून देशाची लोकशाही वाचवू : "आज देशात भावाला भावासोबत लढायला लावलं जात आहे. या देशात गरिबांवर अन्याय होत आहे, म्हणून आम्ही आमच्या प्रवासात न्याय हा शब्दही जोडला आहे 'भारत जोडो न्याय यात्रे'मध्ये अखिलेश यादव यांचं स्वागत आम्ही करत आहोत. आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, आपण सर्व मिळून देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी लढत आहोत," असंही राहुल यांवेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details