महाराष्ट्र

maharashtra

Navratri 2022 : नवरात्रीनिमित्त शिवप्रतिष्ठानची दुर्गामाता दौड; महाराष्ट्रासह कर्नाटकातून चांगला प्रतिसाद

By

Published : Sep 26, 2022, 11:52 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST

()
नवरात्री ( Navratri 2022 ) उत्सवानिमित्त सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान तर्फे दुर्गामाता दौडीला आजपासून सुरुवात ( Durgamata run In Sangli ) झाली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून दुर्गामाता दौडीत खंड पडला होता. मात्र आता पुन्हा मोठया उत्साहात या दुर्गामाता दौडीला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने यामध्ये धारकरी सहभागी झाले होते. तरुणांच्या मनामद्धे देशभक्ती जागृत ठेवण्याच्या उद्देशाने संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून नवरात्रात दरवर्षी दौडीचे ( Durgamata run Organized by Shiv Pratishthan ) आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रासह कर्नाटकातही दौडीला चांगला प्रतिसाद ( Big response to Durgamata ) मिळतोय. गणेशोत्सवाप्रमाणे ही दौड सुद्धा एक सामाजिक उपक्रम म्हणून मानली जाते. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या दौडीत हजारो धारकरी सहभागी होतात. मात्र कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून दौड रद्द करण्यात आल्याने खंड पडला होता. पण यंदाच्या वर्षापासून मोठ्या उत्साहात या दौडीला सुरवात झाली आहे. शुद्ध प्रतिपदापासून ते विजया दशमीपर्यंत ही दौड सुरु असते.
Last Updated :Feb 3, 2023, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details