महाराष्ट्र

maharashtra

Ashadhi wari 2022 : जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रस्थान

By

Published : Jun 20, 2022, 10:04 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST

देहू (पिंपरी) - जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज आषाढी वारीसाठी ( Ashadhi Wari ) पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या हस्ते दुपारी अडीच वाजता पालखीचे प्रस्थान होणार आहे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदाच्या वर्षी पालखी सोहळा पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या पालखी सोहळ्यात लाखोंच्या संख्येने वारकरी पालखी सोहळ्याला दाखल झाले आहेत. राज्यभरातून वारकरी देहूत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय देघू संस्थांकडून पालखीची संपूर्ण तयारी देखील करण्यात आली आहे. मंदिर परिसरात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे.
Last Updated :Feb 3, 2023, 8:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details