महाराष्ट्र

maharashtra

BJP Ruling Party Nagpur : तर... आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत - भाजप नेत्याचा पलटवार

By

Published : Feb 9, 2022, 12:03 PM IST

()
नागपूर - नागपूरच्या धंतोलीतील भाजपच्या विभागीय कार्यालयासमोर भाजपचे पदाधिकारी एकत्र होत आंदोलन केले. काँग्रेसचे पदाधिकारी आमच्या कार्यलयासमोर आंदोलन करणार असेल तर आम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत, जशास तसे उत्तर देऊ असे प्रतिउत्तर भाजपचे सत्तापक्षनेता अविनाश ठाकरे (BJP ruling party leader Avinash Thackeray) यांनी केले आहे. तसेच पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचा बुरखा फाडला (Prime Minister Modi criticism of Congress) आहे. त्यामुळे काँग्रेसचे संतुलन बिघडले आहे, असा आरोप भाजपचे मनपा सत्तापक्ष नेता अविनाश ठाकरे यांनी केला आहे. काँग्रेसचे आंदोलन सुरू झाले नसले तरी भाजपने मात्र नाना पटोले मुर्दाबाद के नारे लावले आहे.काँग्रेसनेच महाराष्ट्रात कोरोना पसरवला असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केले होते. या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा अपमान झाला, असे म्हणत काँग्रेसने ठिकठिकाणी 'शर्म करो मोदी' या मथळ्याखाली आंदोलनाचा इशारा (Congress warns 'Shame on Modi' movement) दिला आहे. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजप कार्यालयासमोर आंदोलन करा, अश्या सूचना काँग्रेसचे पदाधिकरी यांना दिल्या आहेत. पण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यलयासमोर अद्याप पोहचले नसून काँग्रेसने याच पार्श्वभूमीवर नागपूरच्या संविधान चौकात दुपारी आंदोलन (Agitations at Constitution Square in Nagpur) पुकारले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details