महाराष्ट्र

maharashtra

World Press Freedom Day 2023: आतापर्यंत पत्रकारांच्या झाल्या 'इतक्या' हत्या, अनेकांवर झालेत हल्ले

By

Published : May 3, 2023, 10:16 AM IST

जागतिक संघटनेच्या वतीने 3 मे हा जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो. पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी आणि पत्रकारांच्या हक्कांसाठी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन 3 मे रोजी साजरा करण्यात येतो. या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी ट्विट करत माध्यमाबाबत मत व्यक्त केले आहे.

World Press Freedom Day 2023
संग्रहित छायाचित्र

हैदराबाद :आज जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन आहे. या दिनाचे औचित्य साधत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पक्षाध्यपदाच्या राजीनाम्यानंतर पहिले ट्विट करत पत्रकारांना जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांनी पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा मजबूत स्तंभ आहे. पत्रकारिता मूल्ये आणि निष्पक्ष पत्रकारितेचा बाणा जपण्याकरता पत्रकारांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा निर्धार जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनानिमित्त करूया, अशा शुभेच्छा शरद पवार यांनी दिल्या आहेत.

तळागाळातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकार कार्यरत असतात. समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आळा घालण्यासाठी माध्यमातून अनेक पत्रकार आवाज उठवतात. मात्र पत्रकारांवर अन्याय अत्याचार आणि छळ करण्याच्या घटना आता वाढल्या आहेत. माध्यमातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी जागतिक संघटनेनेच्या वतीने 3 मे रोजी जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येतो.

जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन 2023 :इंडिया प्रेस फ्रीडम रिपोर्ट 2021 च्या अहवालात भारतात किमान सात पत्रकार मारले गेले आहेत. त्यासह 121 मीडिया हाऊसना लक्ष्य करण्यात आले. सर्वाधिक पत्रकार आणि माध्यम संस्थांना जम्मू आणि काश्मीरमध्ये लक्ष्य करण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये किमान 25 माध्यमसंस्थांना लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर उत्तर प्रदेश 23 आणि मध्य प्रदेश 16 माध्यमसंस्थांना टार्गेट करण्यात आले. किमान आठ महिला पत्रकारांना अटक करण्यात आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अनेक महिला पत्रकारांना लैंगिक छळाचा सामना करावा लागल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

काय आहे जगभरातील स्थिती :युनेस्कोच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माध्यम विकास जागतिक अहवाल 2021-22 जाहीर करण्यात आला. या अहवालानुसार 2016 पासून 2021 च्या अखेरीस जगभरातील वृत्तपत्र स्वातंत्र्याची स्थिती स्पष्ट करण्यात आली. यात 455 पत्रकार नोकरीवर असताना मारले गेले. 2016 ते 2020 अखेरपर्यंतची ही आकडेवारी आहे. त्यातही मेक्सिको त्यानंतर अफगाणिस्तान, सीरियनमध्ये सर्वाधिक पत्रकारांच्या हत्या झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले.

पत्रकारांना ऑनलाइन हिंसाचाराचा अनुभव :पत्रकारांना धमक्या मिळण्याचे प्रकार नेहमीचे झाले आहेत. आता त्यात ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या धमक्यांचा प्रकार वाढतच आहे. युनेस्को आणि इंटरनॅशनल सेंटर फॉर जर्नालिस्टच्या सर्वेक्षणात ७३ टक्के महिला पत्रकारांना त्यांच्या कामाच्या दरम्यान ऑनलाइन हिंसाचाराचा अनुभव आला. शिवाय वृत्तसंस्थांमध्ये राजकारणासारख्या हार्ड न्यूज बीट्सवर महिलांचे प्रतिनिधित्व कमी केले जात आहे. तर गुणात्मक आणि परिमाणात्मक दोन्ही बातम्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व आणि तज्ञ स्त्रोत म्हणून महिलांना दुर्लक्षित करण्यामध्ये सतत पक्षपातीपणा करण्यात येत असल्याचे दिसून आले. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या देशात प्रेस स्वातंत्र्यात 85 टक्के घट झाल्याचा अहवाल व्हरायटीज ऑफ डेमोक्रसी (V-Dem) संस्थेच्या आकडेवारीवरुन उघड झाला.

हेही वाचा - Kalashtami 2023 : जाणून घ्या कधी आहे कालाष्टमी, काय आहे कालभैरवाची पूजा विधी आणि महत्व

ABOUT THE AUTHOR

...view details