महाराष्ट्र

maharashtra

हिवाळ्यात गुळासोबत खा 'हे' पदार्थ; होणार नाही कोणताच आजार

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 24, 2023, 10:28 AM IST

Winter Health Tips : पोषक तत्वांनीयुक्त असलेला गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे खायला उष्ण असते. त्यामुळं हिवाळ्यात गूळ खाणं खूप फायदेशीर आहे. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासही हे उपयुक्त आहे. तुम्ही गुळासोबत अनेक पदार्थ खाऊ शकता जे स्वादिष्ट आणि शरीरासाठी खूप फायदेशीर मानलं जातं.

Winter Health Tips
हिवाळ्यात गुळासोबत खा हे पदार्थ

हैदराबाद :हिवाळ्यात निरोगी राहायचं असेल तर आहाराची विशेष काळजी घ्या. शरीर उबदार राहण्यासारखे अनेक पदार्थ या ऋतूमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे संसर्गापासून बचाव होतो. या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणं खूप गरजेचं असतं. यासाठी अन्नामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. या आरोग्यदायी गोष्टींमध्ये गुळाचा समावेश आहे, कारण ते खाल्यानं शरीरातील तापमान वाढतं. गुळ हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून तुमचं रक्षण करण्यास उपयुक्त आहे. अनेकदा लोकांना जेवणानंतर गूळ खायला आवडतो. याशिवाय लोक हरभरा आणि गूळही खातात. मात्र हिवाळ्यात तुम्ही गुळासोबत इतरही अनेक गोष्टी खाऊ शकता.

  • मध : हिवाळ्यात रोज मधात गूळ मिसळून खाणं तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतात. हिवाळ्यात बदलत्या ऋतुमध्ये होणारे आजार टाळायचे असतील तर गूळ आणि मध जरूर खा.
  • तुळस :तुळशीच्या पानांमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. हिवाळ्यात लोकांना खोकला आणि सर्दीचा त्रास होतो. यापासून आराम मिळवण्यासाठी ते तुळशीचा चहा पिऊ शकतात. हे करण्यासाठी एका पातेल्यात पाणी गरम करून त्यात तुळशीची पाने, गूळ, काळी मिरी, दालचिनी घाला. हे मिश्रण काही वेळ उकळवा. त्यानंतर ते गाळून प्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
  • तूप :तूप हे सुपरफूड म्हणून ओळखलं जातं. हे अन्नाची चव वाढवतं आणि रोगांपासून संरक्षण करतं. लोक अन्नात तुपाचा वापर अनेक प्रकारे करतात. तुम्ही जेवणानंतर तूप आणि गूळ यांचे मिश्रण खाऊ शकता. ते चयापचय वाढवतं आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देतं.
  • हळद : शरीराला उबदार ठेवण्यासाठी हळदीचं दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही त्यात गूळ मिसळूनही खाऊ शकता. यामुळं सूज येण्यापासून आराम मिळतो. याशिवाय घसा खवखवण्यावर आराम मिळण्यासाठी हे उपयुक्त आहे.
  • आवळा :आवळ्यात व्हिटॅमिन सीने भरपूर आवळा शरीराला निरोगी ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हे इम्युनिटी बूस्टरचं काम करतं. तुम्ही आवळा पावडर किंवा ताजा आवळा गुळात मिसळून खाऊ शकता. यामुळं हिवाळ्यात होणाऱ्या संसर्गापासून आराम मिळतो.
  • आले :लोक हिवाळ्यात आलं खाण्याचा सल्ला देतात. जर तुम्हाला सर्दी-खोकल्याच्या समस्येनं वारंवार त्रास होत असेल तर एकदा आलं आणि गुळाचं मिश्रण करून बघा, ते खाल्ल्यानं आराम मिळेल.

डिस्क्लेमर- दिलेली माहिती केवळ आरोग्यासाठी टिप्स आहेत. मात्र, त्याचा उपचार म्हणून उपयोग करताना वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे.

हेही वाचा :

  1. वाढत्या वयानुसार औषधं घेताना बाळगा सावधगिरी; होवू शकतात परिणाम
  2. केस पातळ होत आहेत? हा घरगुती उपाय बनवेल केशवती
  3. दात आणि हिरड्या निरोगी ठेवू इच्छिता? या टिप्स फॉलो करा

ABOUT THE AUTHOR

...view details