महाराष्ट्र

maharashtra

Winter Diet : हिवाळ्यात आहार योग्य प्रमाणात घेतल्यास होतील अनोखे फायदे, वाचा सविस्तर

By

Published : Jan 20, 2023, 4:25 PM IST

Winter Diet
हिवाळ्यात आहार योग्य प्रमाणात घेतल्यास होतील अनोखे फायदे ()

हिवाळ्यात आरोग्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते हे सर्वांनाच माहीत आहे. पण त्यांच्याशी लढण्यासाठी निसर्गाने आपल्याला अनेक प्रकारच्या भाज्या दिल्या आहेत. हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम मिळते. पालक, चवळी, शेपू, मेथी अशा अनेक भाज्यांमध्येजीवनसत्त्वे आढळतात. तसेच डॉक्टरदेखील आपल्याला हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला देतात.

हैदराबाद :आजच्या धावत्या युगाच्या जीवनात आहार नियमनाकडे लक्ष देणे, मोठे आव्हानदायक होत आहे. आजकाल योग्य आहाराचे पालन करणे किंवा जीवनशैली म्हणून स्वीकारणे हा फूड फॅशन ट्रेंड बनत चालला आहे. योग्य आहारामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात, परंतु अनेक वेळा आहाराचे नियोजन न करता पौष्टिकतेची काळजी घेणे आणि त्याचे प्रमाण न ठरवता व काहीही न खाल्ल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात. शरीराला आवश्यक असलेल्या पोषणापासून वंचित राहावे लागते. हिवाळ्यात खाली दिलेल्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.

1. शेपू : गॅसेस, लहान मुलांची पोटदुखी, जंत, कृमी मुलींमध्ये अनियमित मासिक पाळीसाठी ही भाजी खूप फायदेशीर ठरते. ही भाजी आवर्जून खायला हवी. अनेकदा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे मासिक पाळीत पोट दुखणे, रक्तस्राव अनियमित असणे असे काही त्रास होऊ लागतात. हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. मासिक पाळीतला त्रास कमी करण्यासाठी तुम्ही शेपूच्या भाजीचा आहारात समावेश करायला हवा.

2. अंबाडी : अंबाडी भाजी खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. चवीला आंबट लागणाऱ्या या भाजीत व्हिटॅमिन ए आणि खनिज पदार्थ भरपूर असतात. तसेच यामुळे वजन आटोक्यात राहते, डोळ्यांचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होण्यासाठी मदत होते, केसांचे आरोग्य चांगले राहते. प्रतिकारशक्ती वाढून सतत सर्दी, खोकला होणे कमी होते.

3. मेथी भाजी : मेथी भाजी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. यामध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत करतात. मधुमेही व्यक्तीसाठी अत्यंत उपयुक्त असते. हिवाळ्याच्या आहारात याचा समावेश जरूर करावा. तसेच भूक आणि अन्नपचन सुधारते. हे तुम्हाला अनेक समस्यांपासून वाचवण्यासाठी प्रभावी आहे. याच्या सेवनाने पचनाच्या समस्या दूर होतात.

4. पालक :तज्ज्ञांच्या मते पालकाला सुपर फूड म्हटले जाते. या ऋतूत तुम्ही पालक हिरव्या भाज्याही खाऊ शकता, जे चव आणि आरोग्याने परिपूर्ण आहे. हा आरोग्याचा खजिना आहे, व्हिटॅमिन-ए, मॅंगनीज, कॅल्शियम, प्रथिने आणि इतर अनेक पोषक घटक त्यात आढळतात. हे आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. यामुळे वजन नियंत्रणासोबतच अनेक समस्या दूर होतात.

5. माठ : लाल आणि हिरवी अशा दोन प्रकारात मिळणाऱ्या या भाजीने वजन योग्य प्रमाणात वाढते. आम्लपित्त नियंत्रित होते. तांबडा माठ रक्तवर्धक आहे. शरीरातील कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवता येते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. सर्दी आणि संसर्गापासून बचाव होतो. यात लोहाचे प्रमाण अधिक असते. अ‍ॅनिमिया असलेल्या रुग्णांनी या भाजीचे आवर्जून सेवन करावे.

ABOUT THE AUTHOR

...view details