महाराष्ट्र

maharashtra

चिंताजनक..! कोविड - 19 पीडित गर्भवती महिलांना प्री-एक्लांपसियाचा अधिक धोका

By

Published : Sep 5, 2021, 5:17 PM IST

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

ब्राझीलच्या फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलो मेडिकल स्कूलच्या संशोधकांनी एक वैज्ञानिक पुनरावलोकन केले. त्यात, कोरोना संसर्गग्रस्त गर्भवती महिलांमध्ये प्री-एक्लांपसिया होण्याचा धोका अधिक असतो, असे समोर आले आहे.

ब्राझीलच्या फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलो मेडिकल स्कूलच्या संशोधकांनी एक वैज्ञानिक पुनरावलोकन केले. त्यात, कोरोना संसर्गग्रस्त गर्भवती महिलांमध्ये प्री-एक्लांपसिया होण्याचा धोका अधिक असतो, असे समोर आले आहे.

प्री-एक्लांपसिया ही गर्भधारणेशी संबंधित अवस्था आहे, जी सामान्यत: गर्भधारणेचा अर्धा टप्पा पार केल्यानंतर किंवा बाळाच्या जन्माच्या काही वेळानंतर होते. गर्भधारणेच्या 20 आठवड्यानंतर ते विकसित होण्याची शक्यता अधिक असते. प्री-एक्लांपसियामुळे अपरा म्हणजेच, प्लेसेंटामध्ये रक्तप्रवाह कमी होतो, ज्यामुळे मातेचा रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो आणि गर्भातील बाळाला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषक तत्व मिळत नाही. यामुळे त्याचा विकास देखील बाधित होऊ शकते. या विकारामुळे आई आणि बाळ दोघांनाही गंभीर नुकसान होऊ शकते.

जर्नल क्लिनिकल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या या पुनरावलोकनात आकड्यांच्या एका मोठ्या सेटचे विश्लेषण करण्यात आले होते. ज्यातून निष्कर्ष निघाला की, गर्भधारणेदरम्यान कोरोना संसर्ग झाल्यावर एसीई 2 (प्रोटीन) च्या कार्यावर परिणाम होतो, ज्यामुळे शरीरात प्रोटीनची कमतरता होऊ शकते, जे प्लेसेंटाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावतात. त्याचबरोबर, एसीई 2 चे कार्य प्रभावित झाल्यास मातेचा रक्तदाब देखील प्रभावित होतो.

एसीई 2 एक प्रोटीन आहे, जो कोरोना संसर्ग झाल्यानंतर प्रभावित झालेल्या पेशींना (एसीई 2 रिसेप्टर) बांधण्याचे कार्य करतो. एसीई 2 च्या स्तरात बदल त्या यंत्रणांच्या कामकाजात व्यत्यत आणतात जी रक्तदाब नियंत्रणात करण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून असतात.

फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलो मेडिकल स्कूलमध्ये आपल्या डॉक्टरेट संशोधनाचा भाग म्हणून या आभ्यासाचा नेतृत्व करणाऱ्या अजिन्हेरा नोब्रेगा क्रूज सांगतात की, गर्भवती महिलांमध्ये सार्स कोव्ह - 2 द्वारे संसर्ग होणे आणि प्लेसेंटामध्ये त्यामुळे एसीई 2 चे कार्य प्रभावित होण्यावर करण्यात आलेल्या आभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारावर असा निष्कर्ष काढता येतो की, गर्भवती नसलेल्या महिलांच्या तुलनेत गर्भवती महिलांमध्ये कोविड - 19 संसर्ग गंभीर स्वरुपात विकसित होण्याचा धोका अधिक असतो.

अजिन्हेरा यांनी सांगितले की, पुनरावलोकनात संशोधकांना असे दिसून आले की, गर्भवती महिलांना सार्स कोव्ह - 2 झाल्यावर एसीई 2 रिसेप्टर त्यांच्या प्लेसेंटामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. अशात त्यांच्या शरीरात विषाणूद्वारे एन्झाइमच्या क्रियेला अडथळा घालण्याच्या क्रियेमुळे गर्भवती महिलांमध्ये कोविड - 19 चे गंभीर परिणाम दिसू शकतात. विषाणू या प्रक्रियेचा वापर पेशींवर हल्ला करण्यासाठी करतो, ज्यामुळे कदाचित एसीई 2 ची उपलब्धता कमी व्हायला लागते आणि गर्भधारणेदरम्यान शरीराचे संरक्षण करण्याची त्याची क्षमता देखील कमी होते.

फेडरल युनिव्हर्सिटी ऑफ साओ पाउलोच्या औषध विभागातील संशोधक डुल्से एलेना कासारिनी सांगतात की, शरीरात एसीई 2 च्या कमतरतेने रेनिन-एंजियोटेन्सिन प्रणालीमध्ये असंतुलन होऊ शकते, त्याचबरोबर पेप्टाइड एंजियोटेन्सिन 2 मध्ये वाढ होऊ शकते, ज्यामुळे व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर मातेच्या रक्तदाबाला वाढवते आणि प्री-एक्लांपसियाचा धोका वाढतो.

गर्भवती महिला कोविड - 19 प्रति अधिक संवेदनशील का आहेत? आणि प्री-एक्लांपसियामध्ये कोरोना संसर्गाची काय भूमिका आहे? या विषयावर अधिक आभ्यास करणे गरजेचे आहे, यावर अधिक संशोधन होणे गरजेचे असल्यावर संशोधकांनी भर दिला आहे. नेमके काय होत आहे? हे जाणून घेण्यासाठी प्रयोग करण्यासाठी संशोधक विषाणूने संसर्ग झालेल्या महिलांकडून प्लेसेंटाचे नमुने गोळा करत आहेत. प्री-एक्लांपसिया बरोबरच, प्लेसेंटस इन्फ्लेमेशन वासक्यूलरायझेशनमध्ये नोवेल कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या भूमिकेबाबत देखील त्यांना रस आहे.

हेही वाचा -सागरी जिवांची, साहसी खेळांची आवड आहे? सेशेल्समधील 'ही' ठिकाणे तुम्हाला भुरळ घालतील

ABOUT THE AUTHOR

...view details