महाराष्ट्र

maharashtra

ठाकरे गटाचे 'फायरब्रँड' अडचणीत, पंतप्रधानांविरोधात कथित आक्षेपार्ह लेख लिहिल्यानं गुन्हा दाखल

By PTI

Published : Dec 12, 2023, 7:19 AM IST

Updated : Dec 15, 2023, 1:10 PM IST

Sanjay Raut news ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात यवतमाळमधील उमरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात सामनामध्ये आक्षेपार्ह लेख लिहिल्यानं हा गुन्हा सोमवारी दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनं दिली.

article against PM Modi
Sanjay Raut news

संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार करणारे भाजपा नेते

यवतमाळSanjay Raut news -ठाकरे गटाचे 'फायरब्रँड' म्हणून ओळखले जाणारे खासदार संजय राऊत हे अडचणीत सापडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सामनामध्ये कथित आक्षेपार्ह लेख लिहिल्याबद्दल खासदार राऊत यांच्यावर उमरखेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपाचे यवतमाळ समन्वयक नितीन भुतडा यांनी खासदार संजय राऊतयांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भाजपा नेते भुतडा यांच्या दाव्यानुसार ठाकरे गटाचे नेते राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह लेख लिहिला होता.

  • कलम १५३(A), ५०५(२) आणि १२४(ए) या कलमान्वये ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन गटात शत्रुत्वाची भावना वाढविण्यासाठी प्रोत्साहन दिल्यानं गुन्हा दाखल केल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. संजय राऊत हे शिवसेनेचे (ठाकरे गट) मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादकदेखील आहेत. संजय राऊत हे सातत्यानं भाजपासह मोदी सरकारच्या धोरणाबाबत टीका करत असल्यानं ते नेहमीच चर्चेत असतात.

आपण कोणाविरोधात लिहित आहोत, याचं संजय राऊत यांनी तारतम्य बाळगावं. त्यांना अटक करण्यात यावी-भाजपा, जिल्हा समन्वयक, नितीन भूतडा

एफआयआरनुसार १० डिसेंबरच्या संपादकीयमध्ये काय म्हटले?-मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये काँग्रेसचा विजय झाला असता तर 2024 च्या निवडणुकी आधी मोदींनी पाकिस्तानशी संगनमत करुन एखादा बाँम्ब टाकला असता, एखादे पुलवामा घडतांना उघड्या डोळ्यांनी पाहले असते. काश्मिरातील हिंसाचारक पाकिस्तानचा हात आहे. 'देश खतरेमे है'च्या गर्जना करुन देशभक्तीसाठी भाजपाने मत मागितलं असतं. जवानाच्या शवपेट्यांना वंदन करणारी छायाचित्रे घेऊन फिरवून आपण आपल्यासारखे आपणच, दुसरे कोणीही नाही. हे ठसविण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीचे यांचेवर बिनबुडाचे गंभीर असे दिशाभुल करणारे आरोप जगाच्या पातळीवर देशाची प्रतिमा मलीन करणारे आहेत. या कारणावरून संजय राऊत यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनी केली.


११ डिसेंबरच्या सामनाच्या संपादकीय लेखात काय लिहिले?तेलंगणा विधानसभेच्या प्रोटेम स्पीकरपदी ज्युनिअर ओवेसी यांची नियुक्ती झाल्यावरून ११ डिसेंबरच्या सामनाच्या संपादकीय अग्रलेखात भाजपावर टीका करण्यात आली. ही नियुक्ती तेलंगणाचे राज्यपाल टी. सुंदरराजन यांच्या आदेशानं झाल्यानं भाजपा ढोंगी असल्याची टीका ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आली. भाजपाच्या ढोंगांना व नेत्यांना जनता कंटाळलीय. विशिष्ट धर्माची मते काँग्रेसकडं जाऊ नयेत, यासाठी भाजपानं ओवेसी योजना अमलात आणूनही काँग्रेसचा तेलंगणात विजय झाला. तेलंगणात भाजपाच्या ८ आमदारांनी शपथ घेणार नाही, असे ढोंग रचले.

तेलंगणात मोदी-शाह -नियमानुसार सभागृहात सर्वात ज्येष्ठ सदस्याची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात येते. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्यापूर्वी अकबरुद्दीन ओवेसी हे तात्पुरते विधानसभा अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, भाजपाकडून ओवेसी यांच्याकडून शपथ घेणे म्हणजे हिंदुत्वास बाधा आणणे असे म्हटले जात आहे. भाजपानं हिंदुत्वाचा बुरखा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या नाटकानं बुरखा पाडला. तेलंगणात मोदी-शाह यांच्या भाजपाची धुळधाण उडाल्याचं सामनाच्या संपादकीय लेखात म्हटलं आहे.

  • नुकतेच सोलापूर श्रमिक पत्रकार संघात संजय राऊत यांनी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली होती. त्यांनी म्हटलं की, भाजपा ही व्यापारी वृत्तीच्या मोदी-शाह यांची टोळी झाल्याचा घणाघात केला होता. भाजपा हा राजकीय पक्ष नसून हुकूमशहांचा पक्ष आहे.

हेही वाचा

  1. "एकनाथ शिंदेंना सर्वात मोठा विरोध भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा होता", संजय राऊतांचा गौप्यस्फोट
  2. संजय राऊतांच्या गाडीवर चप्पल भिरकावली, नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा
Last Updated :Dec 15, 2023, 1:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details