महाराष्ट्र

maharashtra

नारळ आणि ज्यूटपासून बनवली गणेशमूर्ती

By

Published : Sep 16, 2021, 10:35 PM IST

Updated : Sep 17, 2021, 4:51 AM IST

ganesha idol

सुमित महेंद्र याने यापूर्वी डिस्पोजल गोष्टींपासून गणेशाची मूर्ती साकारली होती. त्यांच्या या बटुकनाथ मूर्तीला आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे नामांकन देखील मिळाले होते. यंदा त्यांनी केरळ राज्यातील समुद्र थीमवर गणपती तसेच मखराची सजावट सुमितने केली.

यवतमाळ - पर्यावरणाशी नाळ जुळून असलेल्या मारवाडी चौक येथील सुमित महेंद्र या युवकाने या वर्षी नाविन्यपूर्ण संकल्पना घेऊन पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना केली आहे. यंदा नारळापासून गणेशाची मूर्ती तर ज्यूटपासून अप्रतिम असा देखावा साकारला आहे. गेल्या 20 दिवसाच्या अथक मेहनतीतून ही सजावट केली आहे.

नारळ आणि ज्यूटपासून बनवली गणेशमूर्ती

सुमित महेंद्र याने यापूर्वी डिस्पोजल गोष्टींपासून गणेशाची मूर्ती साकारली होती. त्यांच्या या बटुकनाथ मूर्तीला आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे नामांकन देखील मिळाले होते. यंदा त्यांनी केरळ राज्यातील समुद्र थीमवर गणपती तसेच मखराची सजावट सुमितने केली. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नऊ इंच इतकी ही गणेश मूर्ती आहे. गेल्या 20 दिवसापासून सुमित गणपती मखर बनवण्याचे काम करत आहे.

टाकाऊपासून टिाकऊ देखावा

संपूर्ण देखावा हा नारळ आणि ज्यूट पासून तयार केला आहे. यावर्षी सुमितने नारळापासून गणेशाची निर्मिती केली आहे. ही मूर्ती कोरीव आणि देखणी आहे. याशिवाय संपूर्ण डेकोरेशन ज्यूटपासून बनवलेल्या सुतळीने तयार केले आहे. प्रतिष्ठापना झालेला गणपती समुद्रकिनाऱ्यावर विराजमान आहे. यामुळे त्याठिकाणी कृत्रिमरित्या वाळूचे बेट तयार करण्यात आले आहे. याशिवाय नारळ व त्याचे झाड उपयोग सांगणारे फलक देखाव्याच्या बाजूला लावले आहेत.

माहिती फलकाचा वापर

यामध्ये पहिल्या फलकावर नारळाच्या झाडाचा पर्यावरण संवर्धनासाठी कसा उपयोग होतो. त्याच्या मुळापासून त्याच्या फळापर्यंत कुठल्या वस्तू तयार होतात, हे मांडण्यात आले आहे. या माध्यमातून त्याने पर्यावरण विषयक जनजागृती केली आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा काथ्यापासून व खादी पिशव्यांचा वापर करा, वृक्ष संवर्धन करा,पर्यावरण वाचवा स्वच्छ ठेवा असे संदेश दिला आहे. विशेष म्हणजे एका ओल्या नारळावर कोरीव काम करून त्याने गणपतीच्या मूर्तीला पूर्ण रूप दिले आहे. नारळ आणि ज्यूटच्या प्रत्येक भागांपासून बनवलेली सजावट अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.

हेही वाचा -मोठी बातमी! विश्वकरंडकानंतर टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार, विराट कोहलीने केले जाहीर

Last Updated :Sep 17, 2021, 4:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details