महाराष्ट्र

maharashtra

दुचाकीच्या भीषण अपघातात वडिलाचा मृत्यू; तर आई व मुलगा गंभीर जखमी

By

Published : Sep 16, 2021, 7:35 AM IST

दुचाकीचा अपघात

दोन दुचाकींच्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल कारंजा मानोरा मार्गावरील वाकी फाट्यानजीकच्या अडाण नदीपात्राजवळ घडली. ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा दर्शनी भाग उध्वस्त झाला.

वाशिम- दोन दुचाकींच्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार तर तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल कारंजा मानोरा मार्गावरील वाकी फाट्यानजीकच्या अडाण नदीपात्राजवळ घडली. ही धडक एवढी भीषण होती की दोन्ही दुचाकींचा दर्शनी भाग उध्वस्त झाला. संयज दौड (वय 45) असे अपघातात मृत्यू पावलेल्या वडिलाचे नाव आहे. तर विद्या संजय दौड (वय 38) व पार्थ संजय दौड (वय 8)असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या आई व मुलाचे नाव आहे. याशिवाय गणेश रमेश जमादार (रा. फुलउंबरी ता. मानोरा) हे सुध्दा या अपघातात जखमी झाले.

दुचाकीचा अपघात

प्राप्त माहितीनुसार गणेश जमादार व योगेश पत्रे हे दोघेजण (एमएच 27 सीपी 6798) या क्रमांकाच्या दुचाकीने कारंजाहून मानोऱ्याकडे जात होते. दरम्यान विरूद्ध दिशेने येणाऱ्या (एमएच 29 एयू 7041) क्रमांकाच्या बुलेटला त्यांच्या गाडीने समोरासमोर धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच रूग्णवाहिकेने तसेच सचिन वानखडे यांच्या कारने जखमी व्यक्तींना उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आले.

दरम्यान पल्सरवरील दोघांकडे सुरा सापडल्याने पल्सरवरील दोघेजण नेमके कुठे व कशासाठी चालले होते याची उकल मात्र झाली नाही. दरम्यान कारंजा ग्रामीण पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून वृत्त लिहोस्तोवर पुढील तपासाची प्रक्रिया सुरू होती.

ABOUT THE AUTHOR

...view details