महाराष्ट्र

maharashtra

वाशिम : जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात नवीन 30 मार्शल बाईक दाखल

By

Published : Mar 9, 2021, 6:06 PM IST

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते खरेदी केलेल्या या बिट मार्शल बाईकचे उद्घाटन करण्यात आले. दिवसा आणि रात्री गस्तीसाठी खरेदी केलेल्या या 30 बिट मार्शल बाईकमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्याचा विश्वास पोलिसांना आहे.

marshal bike
मार्शल बाईक

वाशिम - जिल्ह्याच्या पोलीस दलात बदल होताना दिसत आहे. कमीत कमी वेळेत अधिक कामे गतीने पार पडावी, म्हणून वाशिम पोलीस दलाने 30 नव्या बिट मार्शल बाईक खरेदी केल्या आहेत.

गरजू महिलांना होणार मदत -

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या हस्ते खरेदी केलेल्या या बिट मार्शल बाईकचे उद्घाटन करण्यात आले. दिवसा आणि रात्री गस्तीसाठी खरेदी केलेल्या या 30 बिट मार्शल बाईकमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसण्याचा विश्वास पोलिसांना आहे. जिल्हा पोलीस दलाचे वाहनांच्या ताफ्यामध्ये नव्याने प्राप्त झालेल्या मोटार सायकल या अतिशय वेगवान आहेत. गस्तीवर असलेले पोलीस अंमलदार हे वायरलेसद्वारे प्राप्त कॉलला लवकरात लवकर प्रतिसाद देऊन गरजू महिला, मुली अथवा ज्येष्ठ नागरिक किंवा इतर गरजू व्यक्तीपर्यंत त्वरित पोहचून त्यांना तत्काळ मदत देण्यास उपयोगी होईल.

हेही वाचा -सर्वच क्षेत्रांना फटका देणाऱ्या कोरोना महामारीला राज्यात १ वर्ष पूर्ण

मोटार सायकलवर बसविण्यात आलेल्या जीपीएसद्वारे नमूद वाहन कोणत्या ठिकाणी आहे? याचे लोकेशन तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यातील नियंत्रण कक्षात माहित होईल. त्यादृष्टीने कोणते वाहन कोणत्या गरजेच्या ठिकाणी विनाविलंब पाठविणे शक्य आहे, हे सोईचे होईल.

हेही वाचा -कांदा, लसूण, मसाला फोडणीसह कालव्याचा रस्सा ही पर्यटकांसाठी पर्वणी

ABOUT THE AUTHOR

...view details