महाराष्ट्र

maharashtra

९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड

By

Published : Nov 8, 2022, 4:39 PM IST

Updated : Nov 8, 2022, 5:09 PM IST

Narendra Chapalgaonkar

९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्षपदी द्वादशीवार यांचेही नाव चर्चेत होते. मात्र निवडीच्यावेळी झालेल्या बैठकीत चपळगावकर यांच्याशिवाय दुसरे नाव पुढे आलेच नाही. त्यामुले अध्यक्षपदासाठी चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नागपूर- ९६ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्षपदी द्वादशीवार यांचेही नाव चर्चेत होते. मात्र निवडीच्यावेळी झालेल्या बैठकीत चपळगावकर यांच्याशिवाय दुसरे नाव पुढे आलेच नाही. त्यामुळे अध्यक्षपदासाठी चपळगावकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

साहित्य संमेलनाची मागणी विदर्भ साहित्य संघाला यावर्षी 200 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे वर्धा इथे साहित्य संमेलनाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार वर्ध्याला साहित्य संमेलन होणार आहे.

कोण आहेत नरेंद्र चपळगावकर?नरेंद्र चपळगावकर हे वैचारिक लेखन करणारे एक संवेदनशील लेखक आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायाधीश आहेत.0 न्यायाधीश होण्यापूर्वी ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते. नरेंद्र चपळगावकर यांनी संघर्ष आणि शहाणपण, दीपमाळ, आठवणीतले दिवस आणि कायदा, माणूस यांसारख्या अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे.

Last Updated :Nov 8, 2022, 5:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details