महाराष्ट्र

maharashtra

Illegal Abortion Racket : वैद्यकीय कायद्याची जाण असलेल्या वकिलाच्या नियुक्तीकरिता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- मनीषा कायंदे

By

Published : Jan 17, 2022, 7:40 PM IST

Updated : Jan 17, 2022, 8:19 PM IST

अवैध गर्भपात प्रकरणात ( illegal abortion racket ) आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी न्यायालयात बाजू मांडताना वैदकीय क्षेत्रातील अभ्यासू आणि जाण असणाऱ्या वकिलांची नियुक्त केली जावी. ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून करणार असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे ( Shivsena MLA Manisha Kayande on illegal abortion ) यांनी सांगितले.

मनीषा कायंदे
मनीषा कायंदे

वर्धा -आर्वी येथील कदम रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणाने वैद्यकीय पेशाला काळिमा ( illegal abortion racket ) फासला आहे. याच प्रकरणाची माहिती घेण्यासाठी शिवसेनेच्या प्रवक्त्या व आमदार मनीषा कायंदे ( Shivsena MLA Manisha Kayande on illegal abortion ) यांनी जिल्हाधिकाऱ्यांसाह पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. याप्रकरणात कोणीही दोषी सुटू नये, यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील जाण असणाऱ्या सरकारी वकिलांची नियुक्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांना भेटून करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

अवैध गर्भपात प्रकरणात पोलिसांच्या तपासाला गती आणि दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांची गरज आहे. या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल आरोग्यमंत्र्यांसह मुख्य सचिवांना देण्यात येणार आहे. या प्रकरणात आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी न्यायालयात बाजू मांडताना वैदकीय क्षेत्रातील अभ्यासू आणि जाण असणाऱ्या वकिलांची नियुक्त केली जावी. ही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून करणार असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे ( Manisha Kayande visit Wardha ) यांनी सांगितले.

याप्रकरणात कोणीही दोषी सुटू नये

हेही वाचा-छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याने दर्यापूर शहरात मोर्चा, शेकडो शिवप्रेमींचा सहभाग

शासकीय रुग्णालयाचा साठा खासगी रुग्णालयात कसा?

आर्वी प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा समोर आला आहे. पोलीस फॉरेन्सिक व आरोग्य विभागाची मदत घेऊन प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. यात काळवीटच्या कातडीचा वनविभागाला तपास करावा लागणार आहे. कदम यांच्या रुग्णालयात शासकीय दवाखान्याला पुरवठा करणारे औषधे सापडले आहे. शासकीय रुग्णालयाचा साठा खासगी रुग्णालयात कसा आला, याचा शोध घेण्याची गरज आहे. बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्यांना पायबंद बसेल. जर हे रॅकेट होते तर त्याचा तपास पोलीस लावणार आहेत, असेही यावेळी बोलताना मनीषा कायंदे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत.

हेही वाचा-BMC Tablet Scam :'...तर महापौरांनी चष्म्याचा नंबर बदलावा'; मनसेची किशोरी पेडणेकरांवर खोचक टीका
निष्पक्षपणे तपास करण्यासाठी आरोग्य विभागाची मदत मोलाची

प्रकरणामधील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम ( Accused Dr Rekha Kadam in abortion ) यांचे पती हे शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहे. त्यांचा सहभाग प्रकरणात येताच पोलिसांनी निरज कदमला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोग्य विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. रुग्णालयात सुरू असलेल्या कारभाराबाबत उपजिल्हा रुग्णालयाकडून तक्रार प्राप्त होणे अपेक्षित होते. यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयातून उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी पोलिसात तक्रार करावी असे पत्रही दिले आहे. पण प्रकरणाला उघडकीस येऊन चार दिवस लोटले असताना आरोग्य विभागाची केली नाही. या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे करण्यासाठी आरोग्य विभागाची मदत मोलाची ठरणार आहे.

Last Updated : Jan 17, 2022, 8:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details