ETV Bharat / city

BMC Tablet Scam :'...तर महापौरांनी चष्म्याचा नंबर बदलावा'; मनसेची किशोरी पेडणेकरांवर खोचक टीका

author img

By

Published : Jan 17, 2022, 6:37 PM IST

मुंबई मनपामध्ये विरप्पन गॅंगने ४० कोटींचा घोटाळा केला आहे. यासंदर्भातील पुरावे मनसेकडे ( BMC School Tablet Scam ) आहेत. यासंदर्भात रितसर आयुक्त स्तरावर चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे ( MNS Leader Sandeep Deshpande ) यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच मुंबई महापौरांना ( MNS Critisize Mumbai Mayor Kishori Pednekar ) हा घोटाळा दिसणार नाही. त्यांनी चष्म्याचा नंबर बदलावा, असा टोलाही त्यांनी यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांना लगावला.

Mns Leader Sandeep Deshpande Press Conference
Mns Leader Sandeep Deshpande Press Conference

मुंबई - मुंबई मनपामध्ये विरप्पन गॅंगने ४० कोटींचा घोटाळा केला आहे. यासंदर्भातील पुरावे मनसेकडे ( BMC School Tablet Scam ) आहेत. यासंदर्भात रितसर आयुक्त स्तरावर चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे ( MNS Leader Sandeep Deshpande ) यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच मुंबई महापौरांना ( MNS Critisize Mumbai Mayor Kishori Pednekar ) हा घोटाळा दिसणार नाही. त्यांनी चष्म्याचा नंबर बदलावा, असा टोलाही त्यांनी यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांना लगावला. दादर ( MNS Sandeep Deshpande PC ) येथील कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

'पुराव्यानिशी चौकशीची मागणी करणार' -

मुंबई महापालिकेच्या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता टॅब खरेदी केली जाते. यंदा सुमारे ४० हजार कोटींचे टॅब खरेदी केली जाणार आहे. स्थायी समितीत यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर झाला आहे. तो मंजूर होण्यापूर्वी सहा वेळा त्यात बदल करण्यात आला. ओळखीच्या कंपनीकडून टॅब खरेदीसाठी सगळा खटाटोप सुरु आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले. टॅबमध्ये कुठल्या सुविधा हव्यात, कोणत्या नाहीत, याच वर्गीकरण झालेले नाही. एकाच दिवसांत निविदा प्रक्रिया पार पडली आहे. येत्या मार्चमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा होतील. परंतु, परिक्षेपूर्वी टॅब मिळतील का, याबाबत साशंकता आहे. जे टॅब दिले जाणार आहेत, त्यात केवळ अभ्यासक्रम आहे. इतर कोणत्याही सुविधा नाहीत. नव्या शिक्षण पद्धतीनुसार त्यात सुधारणा असायला हवी होती. मात्र, त्यात तसे काहीही नाही. मुंबईकरांना दाखवण्यासाठी टॅबचे वाटप केले आहे. याप्रकरणी मनपा आयुक्त स्तरावर चौकशीची मागणी करणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

'भ्रष्टाचारा करायला अक्कल लागते' -

टॅबमध्ये वायफाय, सिमकार्ड नाहीत. घरात ते वापरता येणार नाहीत. कोणत्या शाळेत वायफायची सुविधा नाही. याशिवाय, २० हजार टॅब वापराविना पडून आहेत, असा आरोप देशपांडे यांनी केला. तसेच यापूर्वी खरेदी केलेल्या टॅबबाबत वस्तुस्थिती काय, हे कोणालाच माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणतात, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही. आम्ही म्हणतो, भ्रष्टाचार करायला अक्कल लागते आणि ती तुमच्याकडे ठासून भरली आहे, असा चिमटा देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना काढला. कॉंग्रेसलादेखील मनसेने खडे बोल सुनावले. स्थायी समितीत तुमचे सदस्य असताना, गप्प का तुमचे काही साटेलोटे आहे का, असा सवाल देशपांंडे यांनी उपस्थित केला आहे.

'महापौरांनी चष्मा बदलावा' -

दहावीच्या टॅब घोटाळा उघड केला आहे. संपूर्ण कागदपत्रे आहेत. तरीही महापौर म्हणतील, पुरावे द्या मग आरोप करा. त्यांना आमची विनंती आहे. मनपातील विरप्पन गॅंगचे पुरावे, आम्ही जमा केले आहेत. त्यांनी चष्म्याचा नंबर बदलला तरच सगळं स्पष्ट दिसेल. महापौर तहीरी काहीही करणार नाहीत. कारण ज्यांना टॅब पुरवठा करण्याचे कंत्राट दिले आहे, त्या कंपन्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत. त्यामुळे महापौर त्यांचे काहीही करु शकत नाहीत, असा टोला संदीप देशपांडे महापौरांना लगावला.

हेही वाचा - N.D.Patil Passed Away : कष्टकऱ्यांचा आधार हरपला! शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी.पाटील यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.