महाराष्ट्र

maharashtra

Devendra Fadnavis महात्मा गांधीजींमुळेच आपण स्वातंत्र्य अनुभवतोय

By

Published : Aug 12, 2022, 3:35 PM IST

Updated : Aug 13, 2022, 12:09 PM IST

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis ()

महात्मा गांधीजीमुळेच स्वातंत्र्याला एक वेगळी दिशा मिळाली आहे. त्यांच्यामुळे सामान्य नागरिक स्वातंत्र्य युद्धात सहभागी झाला. त्यामुळेच आज आपल्याला स्वातंत्र्याचा दिवस पाहायला मिळत असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी व्यक्त केले आहे. वर्ध्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य भाजपाच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी फडणवीस वर्ध्यात बोलत होते.

वर्धा - सेवाग्रामच्या पावन भूमीत बापू कुटीत आले की आत्मिक समाधान लाभत एक वेगळी ऊर्जा मिळते. यातच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना जे स्वातंत्र्य आपण आनंदात साजरा करत आहे, हे त्यांचामुळेच मिळाले आहे. महात्मा गांधीजीमुळेच स्वातंत्र्याला एक वेगळी दिशा मिळाली आहे. त्यांच्यामुळे सामान्य नागरिक स्वातंत्र्य युद्धात सहभागी झाला. त्यामुळेच आज आपल्याला स्वातंत्र्याचा दिवस पाहायला मिळत असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी व्यक्त केले आहे. वर्ध्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्य भाजपाच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी फडणवीस वर्ध्यात बोलत होते.



महात्मा गांधीजींनी तळा गळातील लोकांची सेवा करण्याचा संदेश दिला. तेच काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. गरीब कल्याण अजेंडाच्या माध्यमातून चालवत आहेत. देशात 3 कोटी जनतेला घर, 5 कोटींना गॅस सिलेंडर, 6 कोटी जनतेला नळ जोडणी दिली. महात्मा गांधींचे स्वप्न होते की पण शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. आम्ही या निमित्ताने अविरत परिश्रम घेऊन राष्ट्रभक्तीचा संकल्प करण्यासाठी प्रयत्न करू, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.



वर्धेत सेवाग्राम येथील चरखा भवनात जिल्हा प्रशासनाकडून आयोजित स्वातंत्रच्या अमृत महोत्सवच्या कार्यकर्मात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर भाजपाच्या वतीने हुतात्मा स्मारक ते वर्धेच्या आर्वी नाकापर्यंत तिरंगा रॅली आयोजित करण्यात केली होती. या रॅलीला फडणवीस यांनी हिरवी झेंडी दाखवली. मात्र हिरवी झेंडी दाखवल्यावर स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलेटवर स्वार होत काही अंतरापर्यंत सहभाग नोंदवीला. हर घर तिरंगा अभियानात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा व या कार्यक्रमाची जनजागृती होण्याच्या दृष्टीने ही तिरंगा बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती.

हेही वाचा -Har Ghar Tiranga १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दोन्ही दिवशी ध्वजारोहणाचे नियम आहेत वेगळे

Last Updated :Aug 13, 2022, 12:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details