महाराष्ट्र

maharashtra

टिकटॉक व्हिडिओच्या नादात बाईकवरून स्टंट, तरुण गंभीर जखमी 'इन्स्टंट'

By

Published : Aug 1, 2019, 8:18 PM IST

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याआधारे मुरबाड पोलिसांनी जिवावर उदार होऊन स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

बाईक स्टंटबाजी करून टिक टॅक व्हिडिओ करण्याच्या नादात तरुण गंभीर जखमी

ठाणे- बाईक भरधाव वेगाने चालवून टिक-टॉक व्हिडीओ काढण्याच्या नादात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. कल्याण-बदलापूर मार्गावरील बारवी डॅम परिसरातील रस्त्यावर घडली आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे.

बाईक स्टंटबाजी करून टिक टॅक व्हिडिओ करण्याच्या नादात तरुण गंभीर जखमी

टिक टॉक व्हिडीओ काढण्यासाठी काही तरुण कल्याण-बदलापूर मार्गावरील बारवी धरण परिसरात गेले होते. यामधील एक तरुण भरधाव बाईकवर स्टंटबाजी करतानाचा टिक टॉक व्हिडीओ काढत होता. स्टंटबाजी करताना त्या तरुणाचा तोल गेला आणि बाईक जागेवर उलटली. एवढेच नाहीतर ती बाईक त्याच्या अंगावर पडली. या अपघात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याआधारे मुरबाड पोलिसांनी जिवावर उदार होऊन स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे.

Intro:किट नंबर 319


Body:बाईक स्टंटबाजी करून टिक टॅक व्हिडिओ करण्याच्या नादात तरुण गंभीर जखमी

ठाणे : बाईक वरील स्टंटबाजी करताना चे अनेक व्हिडिओ आपण पाहिले असतील. मात्र भरधाव बाईक वर बसून स्टंटबाजी करून टिक टोक व्हिडिओ काढण्याच्या नादात एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे ही घटना कल्याण बदलापूर मार्गावरील बारवी डॅम परिसरातील रस्त्यावर घडली आहे.

टिक टेक व्हिडिओ काढण्यासाठी काही तरुण मुरबाड - बदलापूर मार्गा वरील बारवी डॅम परिसरात गेले होते. यामधील एक तरुणाचा भरधाव बाईकवर स्टंटबाजी करताना चा टिक टोक व्हिडिओ काढत होते, त्याच वेळी स्टंटबाजी करताना त्या तरुणाचा तोल जाऊन बाईक जागर पलटी होऊन त्याच्या अंगावर पडली या अपघात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुरबाडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दरम्यान हा व्हिडीओ दोन दिवसापूर्वी चा असल्याची माहिती समोर आली आहे तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या व्हिडीओच्या आधारे या अपघात प्रकरणी मुरबड पोलीसांनी जीवावर उदार होऊन स्टंटबाजी करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे
ftp fid ( 1 vis)
mh_tha_1_baiek_stnt_1_video_mh_10007



Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details