महाराष्ट्र

maharashtra

Action Against Bogus Doctor : जिल्हा आरोग्य विभागाला आली जाग, पंधरा दिवसांत दोन बोगस डॉक्टरांवर कारवाई

By

Published : Feb 10, 2022, 8:29 PM IST

मुरबाड तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्रातून चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेला शिपाई पांडुरंग घोलप याने १२ वर्षे धसई गावातील घरातच दवाखाना थाटला होता. या मुन्नाभाईच्या चुकीच्या उपचारांमुळे धसईतील पाच आदिवासींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पांडुरंग घोलप यांच्यावर टोकावडे पोलीस ठाण्यात ( Tokawade Police Station ) गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या.

मुरबाड पंचायत समिती
मुरबाड पंचायत समिती

ठाणे- मुरबाड तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्रातून चार वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेला शिपाई पांडुरंग घोलप याने १२ वर्षे धसई गावातील घरातच दवाखाना थाटला होता. या मुन्नाभाईच्या चुकीच्या उपचारांमुळे धसईतील पाच आदिवासींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पांडुरंग घोलप यांच्यावर टोकावडे पोलीस ठाण्यात ( Tokawade Police Station ) गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. मात्र, २००१ पासून २०२१ पर्यंत १५ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली. तरीही मुरबाड तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट पाहून विविध सामाजिक संघटनांनी तहसीलदारांना निवदेन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. तर ५ रुग्णांचे बळी गेल्यावर ला जाग आली असून ( Thane Health Department ) १५ दिवसांत २ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली असून गुन्हे दाखल ( Action Against Bogus Doctor ) करण्यात आले. यामुळे आरोग्य यंत्रणांच्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहेत.

बोगस डॉक्टर व आरोग्य यंत्रणांचे लागेबांधे -मुरबाड तालुक्यात घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर आरोग्य विभागाने तालुक्यातील टोकावडे येथील बोगस डॉक्टर विठ्ठल बुरबुडा आणि मोरोशी येथील बोगस डॉक्टर प्रमोद धनगर या दोघांवर कारवाई करण्यात आली. दोघांनाही टोकावडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर उमरोली गावातील एक बंद दवाखाना सील केला आहे. खळबळजनक बाब म्हणजे आरोपी विठ्ठल बुरबुडा याच्यावर २०१९ सालीही गुन्हा दाखल झाला होता. तरीही तो टोकावडे भागात दवाखाना थाटून रुग्णांवर उपचार करत होता. ग्रामस्थांच्या अज्ञानाचा फायदा घेत असे अनेक मुन्नाभाई बिनधास्तपणे डॉक्टर बनून आपली दुकानं थाटत असल्याचा आरोप आदिवासी संघटनाने केला आहे.

२००१ पासून आतापर्यंत १८ बोगस डॉक्टरांवर कारवाई -पाच रुग्णांचा बळी जाण्यापूर्वी ग्रामीण आरोग्य यंत्रणेकडून २००१ ते २०२१ पर्यंत मुरबाड तालुक्यात १५ बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे २००१ मध्ये मारुती बांदल नावाच्या बोगस डॉक्टराने देहरी गावात दवाखाना थाटला होता. त्यावेळी त्याच्यावर कारवाई करून दवाखाना सील केला. मात्र, त्यांनतरही पुन्हा २००७ आणि २००९ साली त्याच ठिकाणी दवाखाना सुरू केल्याने त्याच्यावर तीन वेळा कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले. २००१ ते आजपर्यंत एकट्या मुरबाड तालुक्यात १८ बोगस डॉक्टरांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी ४ बोगस डॉक्टरांचा मृत्यू झाला तर ४ जणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. तसेच २००१ पासून आतापर्यंत १० दवाखाने बंद करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारती बोटे ( Taluka Health Officer Dr. Bharati Bote ) यांनी माहिती दिली आहे.

संबधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी -काही दिवसांपूर्वीच मुरबाड तालुक्यात ५ आदिवासी रुग्णांचे चुकीच्या पद्धतीने उपचार करून बळी घेणारा बोगस डॉक्टर पांडुरंग घोलप याच्यावर कारवाई करून त्याला टोकावडे पोलिसांनी अटक केली. मात्र, अशा बोगस डॉक्टरला पाठीशी घालणारे ग्रामीण आरोग्य यंत्रणातील संबधित अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसह बोगस डॉक्टरही कारवाईची मागणी आदिवासी क्रांती संघटनेचे उपाध्यक्ष दिनेश जाधव व रिपाईंचे तालुकाध्यक्ष रवी चंदने यांनी मुरबाड तहसीलदारांकडे केली आहे. शिवाय आदिवासी रुग्णांवर चुकीचा उपचार केल्याने ५ जणांचा जीव गेल्यामुळे आदिवासी बांधव संतप्त होऊन रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्यानंतर आरोग्य प्रशासन खडबडून जाग झाले आहे. यामुळे अनेक मुन्नाभाई पसार झाले आहेत.

बोगस डॉक्टरांची शोध मोहीम सुरुच -जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली चार दिवसांपूर्वी जिल्हास्तरीय बोगस डॉक्टरांचे शोध पुनर्विलोकन समितीची बैठक झाली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे ( District Health Officer Dr. Gangadhar Parage ), पोलीस उपअधीक्षक मुणगेकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोषी शिंदे, अन्न व औषध प्रशासन विभाग, पोलीस, तालुका आरोग्य अधिकारी संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते. मुरबाड तालुक्यात झालेल्या बोगस डॉक्टरांच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीत बोगस डॉक्टर शोध मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेने तालुक्यातील अन्य यंत्रणेशी समन्वय करून प्रभावीपणे ही मोहिम राबविण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी ठोंबरे ( Deputy Collector Thombre ) यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा -Search Of Bogus Doctor : ५ रुग्णांचा बळी घेतल्यानंतर बोगस डॉक्टरची शोध मोहीम

ABOUT THE AUTHOR

...view details