महाराष्ट्र

maharashtra

Two Wheeler Theft : पठ्ठ्याने चोरल्या डझनभर दुचाक्या; सीसीटीव्हीमुळे सापडला पोलिसांच्या तावडीत

By

Published : Jan 24, 2023, 10:39 PM IST

Etv Bharat

मित्रांसोबत मौजमजेसाठी बुलेटसह इतर कंपनीच्या डझनभराच्यावर दुचाक्या लंपास करून विक्री करणाऱ्या एका अट्टल चोरट्याला कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेऊन गजाआड करण्यात यश आले. शुभम भास्कर पवार ( वय १९ रा. रांजणोली, भिवंडी ) असे अटक चोरट्याचे नाव आहे.

पठ्ठ्याने चोरल्या डझनभर दुचाक्या; सीसीटीव्हीमुळे सापडला पोलिसांच्या तावडीत

ठाणे :चोरटा शुभम पवार हा मूळचा लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात येल्नुर गावाचा रहिवाशी आहे. तो भिवंडी तालुक्यातील रांजणोली गावात एका भाड्याच्या खोलीत एकटाच राहतो. या चोरट्याला मित्रांसोबत मौजमजा करण्यासाठी पैसे कमी पडले कि तो कल्याण, डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरातील दुचाक्या चोरायचा. त्यामधील बऱ्याच दुचाकींना लॉक नसलेने तो सहज दुचाक्या घेऊन पसार होत असे, विशेष म्हणजे तो बुलेट दुचाकी चोरण्यात माहीर असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यामध्ये चार बुलेटसह इतर कंपनीच्या नव्या दुचाक्यावर त्यांने डल्ला मारला आहे.

१३ दुचाक्या केल्या लंपास - आपल्या चोरीचे बिंग फुटू नये म्हणून ठाणे जिल्ह्यात चोरलेल्या दुचाक्यांना तो पुणे, लातूर, सोलापूर जिल्ह्यात जाऊन विक्री करायचा. विक्रितुन आलेल्या पैश्यातून मौजमजा करत असे. त्याने सर्वाधिक दुचाक्या महात्मा फुले, विष्णूनगर, डोंबिवली, रामनगर या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून १३ दुचाक्या लंपास केल्याचे समोर आले आहे. कल्याण स्टेशन परिसरातील एका बुलेट चोरीचा सीसीटीव्हीच्या फूटेजमध्ये शुभम हा बुलेट चोरी करुन नेत असल्याचे दिसून आले. विशेष याच चोरीच्या दुचाक्याचा तपास कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पथक तपास करीत आहे.

१३ दुचाक्या जप्त - या सीसीटीव्ही फुटेजवरून तसेच पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीवरुन पोलीस उपनिरीक्षक कळमकरसह त्याच्या पथकाने त्याला डोंबिवली पुर्व भागातील कोळेगाव, मानपाडा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने चोरी केलेल्या १६ लाख ५ हजार रुपये किंमतीच्या १३ दुचाक्या पोलिसांनी पुणे, लातूर, सोलापूर जिल्ह्यातून हस्तगत केल्या आहेत. अशी माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त राजकुमार डोंगरे यांनी दिली आहे.

हेही वाचा -Bench Hits Shinde Fadnavis : औरंगाबाद खंडपीठाचा शिंदे-फडणवीसांना दणका; वाचा काय आहे प्रकरण?

ABOUT THE AUTHOR

...view details