ETV Bharat / state

डमी उमेदवारांमुळं लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं गणित बदलणार, पवार विरुद्ध पवार नावामुळं मतदारांत गोंधळ - LOK SABHA ELECTION 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 8:50 PM IST

Lok Sabha Elections
Lok Sabha Elections

LOK SABHA ELECTION 2024 : लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या मताची विभागणी करण्यासाठी डमी उमेदवार राजकीय पक्षांनी उभे केल्याचं दिसून येतं. राज्यात पवार विरुद्ध पवार, लंके विरुद्ध लंके अशी काही उमेदवारांची नावं मतदारांना गोंधळात टाकण्याची शक्यता आहे. मात्र, यामागं विरोधकाची मतविभागणी करण्याचा राजकीय पक्षांचा डाव असल्याचं दिसून येत आहे.

मुंबई LOK SABHA ELECTION 2024 : मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी विविध राजकीय पक्ष डमी उमेदवारांचा वापर करताना दिसतात. राज्यात निवडणुकीचा उत्साह वाढत असताना, राजकीय पक्ष विरोधी उमेदवारांची मतविभागणी करण्यासाठी अनेक शक्कल लढवत आहेत. गेल्या काही वर्षांपासून, मतदारांना गोंधळात टाकण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नावाचा उमेदवार उभे करत आहेत. या लोकसभेतसुद्धा असे उमेदवार उभे राहताना दिसतय.

डमी उमेदवारांचा प्रभाव : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जबरदस्त लढती झाल्या होत्या. जवळपास 37 उमेदवार 5 हजारांपेक्षा कमी मतांनी विजयी झाले होते. ज्यात 1 हजारांपेक्षा कमी मतांची आघाडी घेतलेल्या पाच उमेदवारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, 35 उमेदवार 5, हजार ते 10 हजारांच्या फरकानं विजयी झाले होते. त्यामुळं मताची मोजणी झाल्यावर डमी उमेदवारांमुळं किती मतांची विभागणी होऊ शकते हे 2019 च्या विधासभा निवडणुकीवरून लक्षात येतंय. त्यामुळं विरोधकांना हरवण्यासाठी राजकीय पक्ष डमी उमेदवार उभे करून मतदान आपल्या पदरात पाडण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

‘डमी उमेदवार’ म्हणजे काय? :

निवडणुकीच्या संदर्भात डमी उमेदवार म्हणजे अशी व्यक्ती जी निवडणुकीला उभी असते, मात्र त्याचा निवडणुकीत जिकंण्याचा कोणाताही हेतू नसतो. या उमेदारांमुळं मताची विभागणी होते, त्यामुळं राजकीय पक्षांना डमी उमेदवारांचा फायदा होतो. तसंच राजकारणात कोणत्याही जागेवर राजकीय पक्ष त्यांच्या घोषित उमेदवारांना पर्याय म्हणून दुसरा उमेदवार उभा करतात. काही तांत्रिक किंवा कायदेशीर कारणामुळं अधिकृत उमेदवाराचं नामांकन रद्द झाल्यास अशा उमेदवारांना पर्याय म्हणून उभं केलं जातं.

राज्यात लोकसभेसाठी निवडणूक लढवणारे डमी उमेदवार :

अहमदनगर मतदारसंघ : विद्यमान भाजपा खासदार सुजय विखे यांनी डमी उमेदवाराची 50 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. त्यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नीलेश साहेबराव लंके यांना डमी अर्ज भरण्यास सांगितलंय. कारण विरोधी पक्षाच्या उमेदवाराचं नावसुद्धा लंके यांच्या नावाशी मिळत-जुळतं आहे.

रायगड मतदारसंघ : रायगड जिल्ह्यात सेम नावाचा उमेदवार उभा करून आव्हान उभं करण्याची परंपरा आहे. या लोकसभा निवडणुकीतही तीच पद्धत वापरण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या नावासारखे तब्बल तीन उमेदवार उभे राहिल्यानं मतविभागणीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. 2014 मध्ये याच नावामुळं विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा पराभव झाला होता. तटकरे यांचा गीते यांच्याकडून अवघ्या 2000 मतांनी पराभव झाला होता. कारण सुनील तटकरे यांच्यासारखंच नाव असलेल्या उमेदवाराला 9 हजारांहून अधिक मते मिळाली होती.

बारामती मतदारसंघ : यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात रिक्षावाला संघटनेतर्फे शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कारण शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव देखील डमी उमेदवारासारखच आहे. मात्र या उमेदवाराचं नाव शरद शरद राम पवार असं असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षांचं नाव शरद गोविंदराव पवार असं आहे. त्यामुळं मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिरूर मतदारसंघ : शिरूर लोकसभेत शिवाजी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे या दोघांनीही आपलं चिन्ह बदललं आहे. कारण धनुष्यबाण चिन्हाचं गेल्या 20 वर्षांचं समीकरण यंदा बदललं आहे. शिवाजी आढळराव पाटील यांना आता राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळं ते घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत. तसंच विद्यामान खासदार अमोल कोल्हे यांनी 2019मध्ये घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढली होती. मात्र, आता त्यांना तुतारी फुंकणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागतेय. कोल्हे यांच्या घड्याळ चिन्हावर आढळराव पाटील उभे राहिल्यानं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

तुतारी चिन्ह : शिरूर लोकसभेत मनोहर वाडेकर यांना तुतारी चिन्ह मिळालं आहे. दोन्ही चिन्हात काहीसा बदल असला तरी निवडणूक आयोगानं दोन्ही चिन्हांच्या उल्लेखात 'तुतारी' हा शब्द ठेवला आहे. त्यामुळं चिन्ह पाहून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे वाचलंत का :

  1. शिंदे गटात लेट एन्ट्री घेणाऱ्या रवींद्र वायकर यांना लोकसभा उमेदवारी, 'या' मतदारसंघातून लढणार - Lok Sabha Election 2024
  2. तुमच्या संपत्तीवर काँग्रेसचा डोळा, पंतप्रधान मोदींचा दावा - PM Modi solapur meeting
  3. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं खोटी शपथ घेणाऱ्यांना शिक्षा करण्याची वेळ, मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल - PM Modi Malshiras Sabha
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.