महाराष्ट्र

maharashtra

The Kerala Story Shooting : लपूनछपून केली होती 'द केरला स्टोरी'ची शुटिंग; केरळमध्येही विरोध

By

Published : May 30, 2023, 6:06 PM IST

द केरळ स्टोरी हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून कमाईमध्ये धमाका करताना दिसत आहे. 'द केरला स्टोरी' हा बहुचर्चित चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान चित्रिकरणाला देखील विरोध झाल्या होता. त्यामुळे केरळमधील चित्रिकरण परवानगी शिवाय लपुनछपून करावे लागले होते. असा धक्कादायक गौप्यस्फोट चित्रपटाचे निर्माते विपुल शहा यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

The Kerala Story
द केरला स्टोरी

द केरला स्टोरी चित्रिकरणाविषया माहिती देताना विपुल शहा

ठाणे: केरळ स्टोरी रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. अनेक वादांनंतर हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित झाला. तर ठाणे येथे सकल हिंदू समाज व रुद्र प्रतिष्ठान तसेच जय फाउंडेशन यांच्यावतीने, एडव्होकेट धनंजय सिंह सिसोदिया यांनी कोरम मॉल मधील चित्रपटगृहात महिला वर्गांकरिता मोफत चित्रपट दाखवला. यावेळी, शहा यांनी प्रेक्षकांशीही हितगुज करीत चित्रपटाला विरोध करणाऱ्याना गर्दीने उत्तर दिल्याबददल आभार मानले. याप्रसंगी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या, परिक्षित धुमे, अ‍ॅड.अमित सिंह आदीसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद: केरळमधील दहशतवादी कटांवर आधारित असलेला `द केरला स्टोरी' चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाच्या कथानकात केरळ राज्यातील मुलींची फसवणूक कशा पद्धतीने करण्यात आली होती, याचे वास्तव चित्रण आहे. तरीही काही समाजद्रोहीकडुन या चित्रपटाला विरोध होत असतानाही ठाण्यात या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला आहे.

महिलावर्गासाठी मोफत शो: सकल हिंदू समाज व रुद्र प्रतिष्ठान तसेच जय फाउंडेशन यांच्यावतीने अ‍ॅड. धनंजयसिंह सिसोदिया यांनी आयोजित केलेल्या या चित्रपटाच्या मोफत शोला महिलावर्गाचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. सोमवारीही धनंजय सिंह यांनी, कोरम मॉलमध्ये 'द केरला स्टोरी' चित्रपटाचा मोफत शो आयोजित केला होता. यावेळी चित्रपटाचे निर्माते विपुल शहा, किरीट सोमय्या, निल सोमय्या, विकासक अमरसिंग, बलजिंद्र कुमार, विनोद गुप्ता, परिक्षित घुमे, सुमित सिंग, अँड.अमित सिंह आदी उपस्थित होते.

तब्बल सात वर्ष अभ्यास करून द केरळ स्टोरी हा चित्रपट तयार केला. केरळमधील चित्रिकरण हे परवानगी शिवाय लपुनछपून करावे लागले. - निर्माते विपुल शहा



बंदीची मागणी का करतात: चित्रपटाविषयी बोलताना, विपुल शहा यांनी, या विषयावर तब्बल सात वर्ष अभ्यास केल्याचे सांगितले. केरळमध्ये चित्रिकरणासाठी कुणीच सहकार्य करीत नसल्याने मुंबईतच सेट उभारून चित्रपट पुर्ण केला. तर केरळमधील काही चित्रिकरण लपुनछपुन करावे लागल्याचे शहा यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी, काहीजण या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी का करत आहे कळत नाही. पण आम्हाला या राजकारणामध्ये पडायचे नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकास टिका करण्याचा हक्क आहे. परंतु चित्रपट पाहण्यासाठी होणाऱ्या गर्दीतूनच त्यांना उत्तर मिळाले असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -

  1. Kirit Somaiya on NCP राष्ट्रवादी लव जिहादचे समर्थन करणार का किरीट सोमय्या यांचा सवाल
  2. The Kerala Story Box Office द केरळ स्टोरी या चित्रपटाने 200 कोटींचा आकडा पार केला
  3. SC to watch The Kerala Story याचिकेवर सुनावणीपूर्वी द केरळ स्टोरी पाहण्याची सर्वोच्च न्यायालयाची इच्छा

ABOUT THE AUTHOR

...view details