महाराष्ट्र

maharashtra

कसारा घाटात संरक्षक कठडे तोडून ४०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; अपघातात एक ठार

By

Published : Jun 3, 2021, 6:55 PM IST

कसारा घाटात संरक्षक कठडे तोडून ४०० फूट खोल दरीत ट्रक कोसळला आहे. या अपघातात एक जण ठार झाला आहे.

accident
अपघात

ठाणे - मुंबई - नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटात ट्रक चालकाचं नियंत्रण सुटून अचानक घाट मार्गाचा संरक्षक कठडे तोडून ट्रक ४०० फूट खोल दरीत कोसळून एक जण जागीच ठार झाला आहे, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

हा ट्रक खाली असलेल्या हिवाळा ब्रिज या रेल्वे पूलाच्या ट्रॅकवर पडला नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. रामनाथ भिकाजीं उशीर (रा. निफाड, जिल्हा नाशिक) असे मृत चालकाचे नाव असुन, जखमी सचिन शिंदे याला नॅशनल हायवेच्या रुग्णावाहिकेतून उपचारासाठी घोटी येथे तर मृत रामनाथ उशीर यांचा मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदणासाठी पाठवण्यात आला.

घाट रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे संरक्षक कठडे बांधकाम करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या महामार्ग ठेकेदार व पोट ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी आपघातांतील मृत रामनाथ उशीर यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

चालकाचा मृतदेह काढला ४०० फूट खोल दरीतून

हेही वाचा -मुकेश अंबानी यांनी 'इतके' घेतले वेतन; वाचून बसेल धक्का

मुंबईहुन नाशिककडे आज पहाटेच्या सुमारास ट्रक क्रमांक 15.AG.0297 जुन्या कसारा घाटात भरधाव वेगात नागमोडी वळण घेत असतांना चालकाचा ट्रक वरील ताबा सुटला व ट्रकने पुढे असलेल्या MH.04. JK 5417 या ट्रक ला धडक दिली व थेट दरीत कोसळला सुमारे ४०० फुट खोल दरीत मध्यरात्रीच्या २ वाजता अंधारात कोसळल्याची माहिती मिळताच कसारा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीम, महामार्ग पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दरीत पडलेल्या ट्रक मधील सचिन शिंदे याला रस्त्याखाली असल्याने जखमी अवस्थेत बाहेर काढलं व दरीत बेपत्ता चालकाचा शोध सुरु केला परंतु काही आढळून न आल्याने आज सकाळी पुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, कसारा पोलीस अधिकारी केशव नाईक, महामार्ग पोलीस अधिकारी अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन टीम चे शाम धुमाळ, दत्ता वाताडे, देवा वाघ, लक्ष्मण वाघ मनोज मालवा, महामार्ग पोलीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हिरे, ए एस आय सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल गुजरे, सावकार,लगड, गोरे, आहेर, कसारा पोलीस ठाण्याचे रोंगटे,ए एस आय मेंगाळ यांनी दरीत उतरून तब्बल दोन तासात अडकलेला चालकाचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी ४०० फूट खोल दरीतून वर काढला.

रेल्वे पुलावर ट्रक कोसळला असता तर मोठी दुर्घटना

मुंबई नाशिक महामार्ग वरील कसारा घाटाच्या खाली मुंबईहुन नाशिकसह लांबपल्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचा लोहमार्ग आहे. घाटाच्या खाली लोहमार्गांवरील ब्रिटिश खालीन हिवाळा पूल आहे. या हिवाळा पुलावरून वरून दररोज दिवस रात्र रेल्वे सेवा सुरु असते वरील घाटावर महामार्ग व खाली रेल्वे मार्ग असलेल्या या कसारा घाटात जर आपघात ग्रस्त ट्रक २५ ते ३० फूट अलीकडे कोसळला असता तर तो ट्रक हिवाळापुलावर व लगतच्या सुरक्षा चौकीवर पडून चौकीत असलेल्या पोलीस व रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी दुखापत झाली असतीच पण हिवाळा पूल वरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद पडली असती. खळबळजनक बाब म्हणजे या सुमारास एखादी मेल - एक्सप्रेस नाशिक दिशेने जात असती तर मोठी दुर्घटना घडली असती. याप्रकरणी कसारा घाट मार्ग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

हेही वाचा -कोरोना संकट : 'आभाळमाया' देणाऱ्या वृद्धाश्रमात मिळतेय जागतिक दर्जाची आरोग्य सुविधा

ABOUT THE AUTHOR

...view details