महाराष्ट्र

maharashtra

नवी मुंबईतीलही 500 चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ, एकनाथ शिंदे यांची घोषणा

By

Published : Jan 3, 2022, 8:04 PM IST

नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, अशी नववर्षाची भेट दिली. आज (दि. 3 जानेवारी) नगरविकास मंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई शहरातील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, अशी घोषणा केली आहे. यामुळे नवी मुंबई शहरात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

नवी मुंबई -नवीन वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, अशी नववर्षाची भेट दिली. आज (दि. 3 जानेवारी) नगरविकास मंत्री तसेच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Khadse ) यांनी नवी मुंबई शहरातील पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ ( Navi Mumbai News ), अशी घोषणा केली ( Property Tax Waiver ) आहे. यामुळे नवी मुंबई शहरात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे.

नवी मुंबईला सावत्रपणाची वागणूक का देता..?

मुंबई शहरातली पाचशे चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी केली होती. मात्र, मुंबई नजीक असणाऱ्या नवी मुंबई शहराच्या बाबतीत मात्र त्यांनी असे काहीही सांगितले नव्हते. त्यामुळे नवी मुंबई शहराला सावत्रपणाची वागणूक का देता, असा सवाल नवी मुंबईचे आमदार भाजप नेते गणेश नाईक यांनी उपस्थित केला होता. तसेच मालमत्ता कर माफीचा प्रस्ताव तत्काळ मंजूर करा, अशी मागणीही नाईक यांनी राज्य शासनाकडे केली.

हेही वाचा - मुंबईकरांना राज्य सरकारकडून नववर्षाचं मोठं गिफ्ट.. 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ

ABOUT THE AUTHOR

...view details