ETV Bharat / city

मुंबईकरांना राज्य सरकारकडून नववर्षाचं मोठं गिफ्ट.. 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ

author img

By

Published : Jan 1, 2022, 4:12 PM IST

Updated : Jan 1, 2022, 4:50 PM IST

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्य सरकारने मुंबईकरांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मुंबईतील 500 स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना (Property tax exempt for 500 square feet homes) यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरविकास खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

500 sq feet property tax waiver for houses
500 sq feet property tax waiver for houses

मुंबई - नव्या वर्षात मुंबईकरांसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठी भेट दिली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील 500 स्क्वेअर फुटांच्या घरांना मालमत्ता कर (Property tax exempt for 500 square feet homes) माफ केला आहे. खरंतर शिवसेनेने आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी ही घोषणा केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेत या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून होता. नगरविकास विभागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. (uddhav thackeray government decision) यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांनी ही घोषणा केली.

500 चाैरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी दिल्यामुळे आता महापालिकेचा दरवर्षी 340 कोटींचा महसूल बुडणार आहे. मुंबईमध्ये 500 चाैरस फुटांची जवळपास 15 लाख घरे आहेत. ज्यामध्ये 28 लाख कुटुंबे राहतात. या सगळ्या कुटुंबियांना मोठा दिलासा सरकारकडून मिळाला आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली असून ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला तसेच या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा अशा सुचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या. या निर्णयामुळे साधारणत: १६ लाख कुटुंबांना लाभ होणार आहे.

500 sq feet property tax waiver for houses
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री ठाकरेंची घोषणा -
शिवसेनेने आपल्या बृहमुंबई महानगर पालिका निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी ही घोषणा केली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. मंजुरी मिळाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पडून होता. अखेर मुंबई महापालिका निवडणुकीचा तोंडावर राज्याच्या नगरविकास विभागाने याला मंजुरी दिली आहे. नगरविकास विभागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे.
मुंबई देशाचे आर्थिक केंद्र -

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, १९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळतेय. आमची ही चौथी पिढी, आजोबा, वडील, मी आणि आता आदित्य. काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम आम्ही पुढे नेत आहोत. शिवसेनाप्रमुख स्वत: जाऊन कामाची पहाणी करत. मी ही नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल ते जाऊन पहात होतो आता हे काम आदित्य करत आहे.

शिवसेना परंपरा जपते -

मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देत आहे. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाहीत.आता शिवसेनेसोबत आणखी काही मित्र आले. मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल. शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेली परंपरा शिवसेना जपते. जे काम जमणार असेल तेच वचन द्यायचे, जे जमणार नाही अशी खोटे वचने द्यायची नाहीत, त्यांची हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा - PM Kisan Scheme Installment Release : पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

निर्णय तत्काळ अंमलात आणा -

२०१७ ला जे निवडणुकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, यातील बहूतांश वचने पूर्ण केली. आज एक महत्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत आहे. ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराचा मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो. ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराचा मालमत्ताकर माफ तत्काळ अंमलात आण्याचा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. देशाचे आर्थिक केंद्र असणाऱ्या मुंबईकरांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न आहे. ज्यांनी कष्ट करून घाम गाळून मुंबईला उभी केली त्यांच्यासाठी हा निर्णय आहे. त्यांच्यासाठीच्या वचनाला आपण आज जागलो आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Last Updated : Jan 1, 2022, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.