महाराष्ट्र

maharashtra

VIDEO : अंबरनाथमध्ये भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, वाहने अडवून पादचाऱ्यांना शिवीगाळ

By

Published : Sep 26, 2021, 7:20 PM IST

Updated : Sep 26, 2021, 7:51 PM IST

drunk-young-girl-creates-ruckus-

एका मद्यधुंद तरुणीने भररस्त्यात धिंगाणा घातल्याचा प्रकार अंबरनाथमध्ये घडला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे. तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या काही जणांना शिवीगाळ केली. अखेर तासाभराच्या तमाशानंतर ही तरुणी तिच्या मित्रासोबत निघून गेली.

ठाणे - जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि खुनाच्या घटना ताज्या असतानाच उल्हासनगरात भररस्त्यात एका मद्यधुंद तरुणीने वाहने अडवून धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. चार दिवसांपूर्वीपासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल झाला असून धिंगाण्याचा कळस गाठणाऱ्या तरुणीवर नेटकऱ्यांमधून टीकेचा सूर उमटू लागला आहे.

मद्यधुंद अवस्थेतमधील तरुणी कारसमोर..

उल्हासनगर - अंबरनाथ मार्गावरील कॅम्प क्रमांक ४ च्या ओटी सेक्शन मार्गाने एक तरुण आपल्या परिवारासह कारने जात होता. त्यावेळी अचानक मद्यधुंद अवस्थेत असलेली ही तरुणी कारसमोर आली आणि कारवर हात आपटत हुज्जत घालू लागली. तरुणाने तिला समजावण्याचा प्रयत्न करून तिच्या तावडीतून सुटका केली. मात्र पूर्णपणे दारूच्या नशेत असलेल्या या तरुणीने रस्त्यावरून जाणाऱ्या आणखी काही वाहनचालकांना अडवून हुज्जत घातली. त्यामुळे काही नागरिकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.

व्हायरल व्हिडिओ

अर्धा पाऊणतास भररस्त्यात धिंगाणा; पोलीस आले आणि गेले..

व्हायरल व्हिडिओमध्ये ही तरुणी धिंगाणा घालत अश्लील शिवीगाळ करत होती. हा प्रकार अर्धा पाऊणतास भररस्त्यात सुरू होता. तुफान धिंगाणा घातल्यावर ही तरुणी निघून गेली. तर विठ्ठलवाडी पोलीस घटनास्थळी आले असता ती तरुणी एका मित्राच्या दुचाकीवरून निघून गेली होती. त्यामुळे पोलिसांना हात हलवत परतावे लागले.

हे ही वाचा -आरती साहूचा 'तो' व्हिडीओ होतोय व्हायरल, बजरंग दलाने केली कारवाईची मागणी

Last Updated :Sep 26, 2021, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details