महाराष्ट्र

maharashtra

सोलापूर महापालिकेसमोर स्वच्छता उपकर विरोधात माकपचे धरणे

By

Published : Sep 19, 2020, 4:54 PM IST

Updated : Sep 19, 2020, 7:06 PM IST

सोलापूर महापालिकेने शहरवासियांवर स्वच्छता उपकर लादला आहे. याविरोधात माकपने आज महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले. हे उपकर रद्द न केल्यात येत्या काळात 50 हजार कार्यकर्ते व श्रमिकांसह महापालिकेला घेराव घालण्याचा इशारा माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिला आहे.

आंदोलक
आंदोलक

सोलापूर- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सोलापूरकरांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता महानगरपालिका प्रशासनाने स्वच्छता उपकर लादला आहे. गोरगरीब नागरिकांना या स्वच्छता उपकराबद्दल माहितीच नाही, असा दावा करून या उपकराविरोधात माकपने आंदोलनाचे हत्यार उपसले. शनिवारी (दि. 19 सप्टें.) सकाळी सोलापूर महानगरपालिकेसमोर माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. स्वच्छता उपकर रद्द न केल्यास भविष्यात 50 हजार कार्यकर्ते व श्रमिकांना घेऊन इंद्रभुवन इमारतीला (महापालिका) येथे घेराव घालू, असा इशारा यावेळी देण्यात आला.

बोलताना माजी आमदार नरसय्या आडम

यावेळी महापौर श्रीकांचना यंनम, पक्षनेते श्रीनिवास करली, विरोधी पक्षनेता महेश कोठे व अन्य पदाधिकारी यांना निवेदने देण्यासाठी शिष्टमंडळ गेले असता, सर्व पदाधिकारी विलगीकरण असल्यामुळे सरकारचे प्रतिनिधी म्हणून सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना निवेदन देण्यात आले. महापालिका उपकर रद्द करा, लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल माफ करा, संघटित कामगारांना व श्रमिकांना 10 हजार रुपये अनुदान द्या, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करा, अशा घोषणा माकपच्या नेत्यांनीयावेळी दिल्या. यावेळी नसीमा शेख, सिद्धपा कलशेट्टी, नलीनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, युसुफ शेख, हनिफ सातखेड, अनिल वासम, सुनंदा बल्ला, शेवंता देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा -सोलापूरमधील मृत कोरोना वॉरिअर्सचे नातेवाईक मदतीविना; 50 लाखांच्या सहाय्याची घोषणा हवेतच

Last Updated : Sep 19, 2020, 7:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details