महाराष्ट्र

maharashtra

ATM cut by gas cutter : एटीएम गॅस कटरने कापून 49 लाखांची चोरी

By

Published : Jun 9, 2022, 1:36 PM IST

ATM cut by gas cutter

भारतीय स्टेट बँक तसेच कुरुलमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम ( Thieves cut off ATM )गॅस कटरने कापून 49 लाख 27 हजार 500 रुपायांची ( 49 lakh stolen from ATM ) रोकड चोरट्यांनी लांबवली. 8 जून रोजी पहाटे हा प्रकार उडकीस आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

सोलापूर-मोहोळ तालुक्यातील विजापूर महामार्गावर असलेल्या तीन बँकांच्या एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. भारतीय स्टेट बँक तसेच कुरुलमधील बँक ऑफ इंडियाचे ( Bank of India ATM cut by gas cutter ) एटीएम गॅस कटरने कापून 49 लाख 27 हजार 500 रुपायांची रोकड चोरट्यांनी लांबवली आहे. 8 जून रोजी पहाटे हा प्रकार घडला. याप्रकरणी मोहोळ पोलीस, कांमती पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे. या घटनेने परिसरात असलेल्या एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

एटीएममधून 49 लाखांची चोरी

गॅस कटरने कापले एटीएम - रहदारी असलेल्या शहराच्या प्रमुख चौकात हा प्रकार घडला आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर हिरव्या रंगाचा स्प्रे मारून गॅस कटरने एटीएम कापले. याबाबत किरण संजय लांडगे (रा. सैनिकनगर, सोलापूर) यांनी मोहोळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. घटनेतील चोरटे एकच असण्याची शक्यता मोहोळचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी वर्तवली आहे.



हेही वाचा- Raj Thackeray : राज ठाकरे यांना शिराळा न्यायालयाने पुन्हा बजवला अजामीनपात्र वॉरंट

ABOUT THE AUTHOR

...view details