महाराष्ट्र

maharashtra

भात खरेदी बोनस ऐवजी धान लागवड क्षेत्राच्या प्रमाणात आर्थिक मदत करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

By

Published : Mar 22, 2022, 2:04 PM IST

बोनस स्वरुपात ( Ajit Pawar on rice purchase bonus ) दिली जाणारी रक्कम ही शेतकऱ्याला मिळण्या ऐवजी भात खरेदी प्रक्रियेतील दलालांनाच मिळत आहे. या लाभापासून शेतकरी वंचित राहत आहेत. त्यामुळे, यावर्षीपासून भात खरेदी बोनस ऐवजी शेतकऱ्यांच्या धान लागवड क्षेत्राच्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

financial assistance konkan farmer ajit pawar
भात खरेदी बोनस अजित पवार प्रतिक्रिया

सिंधुदुर्ग - भात खरेदी बोनस ( Ajit Pawar on rice purchase bonus ) बाबत आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात सभागृहाचे लक्ष वेधले. त्यावर उत्तर देताना वित्त व नियोजन मंत्री अजित पवार म्हणाले की, बोनस स्वरुपात दिली जाणारी रक्कम ही शेतकऱ्याला मिळण्या ऐवजी भात खरेदी प्रक्रियेतील दलालांनाच मिळत आहे. या लाभापासून शेतकरी वंचित राहत आहेत. त्यामुळे, यावर्षीपासून भात खरेदी बोनस ऐवजी शेतकऱ्यांच्या धान लागवड क्षेत्राच्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात येणार आहे. त्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार

हेही वाचा -Mango Crop In Sindhudurg : सिंधुदुर्गात उष्णतेची लाट! वाढत्या तापमानाचा आंबा पिकाला फटका

सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात आली आहे. भाताला क्विंटलमागे एकूण १ हजार ९४० रुपये दर देण्यात आला. मात्र, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसची रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. त्याबाबत विधानसभा अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी लक्ष वेधले. शेतकऱ्यांना बोनसची रक्कम जाहीर करण्याची मागणी त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली. त्यावर सविस्तर माहिती देताना अजित पवार म्हणाले की, भात खरेदीनंतर राज्य सरकारच्या माध्यमातून बोनस स्वरुपात दिली जाणारी रक्कम ही शेतकऱ्याला मिळण्या ऐवजी भात खरेदी प्रक्रियेतील दलालांनाच मिळत आहे. शेतकऱ्यांना ती रक्कम मिळत नाही. शेतकऱ्यांच्या नावाखाली मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्याच हातामध्ये जावी, हा मुख्य उद्देश असून, यावर्षीपासून भात खरेदी बोनस ऐवजी शेतकऱ्यांना दुसरा लाभ मिळवून दिला जाणार आहे. शेतकरी जेवढ्या क्षेत्रात धान पिकवतात तेवढ्या क्षेत्राच्या प्रमाणात प्रति एकर प्रमाणे आर्थिक मदत करण्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलेल्या भाताची खरेदी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी भात खरेदी केंद्रे निश्चित करून यावर्षी देखील उच्चांकी भात खरेदी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना क्विंटलमागे एकूण १ हजार ९४० रुपये दर मिळवून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या भाताला दर वाढवून देण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या भात पिकाला गेल्या दोन वर्षांत अधिकचा दर देण्यात आला आहे.

हेही वाचा -Venkaiah Naidu visit to Goa : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू गोवा दौऱ्यावर! आज करणार दरबार हॉलचे उद्घाटन

ABOUT THE AUTHOR

...view details