ETV Bharat / state

Mango Crop In Sindhudurg : सिंधुदुर्गात उष्णतेची लाट! वाढत्या तापमानाचा आंबा पिकाला फटका

author img

By

Published : Mar 18, 2022, 12:50 PM IST

यंदा आंबा पिकास मोठा फटका बसला आहे. सततच्या वाढत्या तापमानामुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आंबा फळगळ व फळे फुटण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. (Mango Crop In Sindhudurg) या वाढत्या तापमानाचा फटका आंबा उत्पादनास बसणार असून येत्या आठ दिवसात फळगळीत वाढ होण्याची भीती आंबा बागायतदार व्यक्त करीत अहेत.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंब्याचे पीक
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंब्याचे पीक

सिंधुदूर्ग - अचानकपणे तापमानात वाढ झाल्याने त्याचा मोठा फटका आंबा पिकास बसला आहे. सततच्या वाढत्या तापमानामुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आंबा फळगळ व फळे फुटण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. (Mango crop in Sindhudurg district) या वाढत्या तापमानाचा फटका आंबा उत्पादनास बसणार असून येत्या आठ दिवसात फळगळीत वाढ होण्याची भीती आंबा बागायतदार व्यक्त करीत अहेत.

व्हिडिओ

आंब्याच्या झाडास पाणी जास्तीत जास्त द्यावे

सततच्या हवामानाच्या लहरी पणाचा सर्वाधिक फटका कोकणच्या आंबा व काजू बागायतदार याना बसला आहे. (Mango grower Sindhudurg) अलीकडेच सातत्याने वाढलेली थँडी त्यानंतर गारपीट व अवकाळी पाऊस यामुळे केवळ २५ टक्के उत्पन्न मिळणार होते. ते अचानकपणे वाढलेत्या उष्णतेमुळे आंबा उत्पन्नात घट होणार आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारशीनुसार आंब्याच्या झाडास पाणी जास्तीत जास्त द्यावे व भर दुपारी आंबे काढणी व भरणी करू नये असा सल्ला दिला आहे.

अति उष्णता यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला

बदलत्या वातावरणाचा फटका, त्यात आंब्याचे उत्पन्न एक ते दोन महिन्यांनी उशिराने आले. त्यानंतर शेकऱ्याला काहीशी आशा होती की आलेल्या मोहोरातून काहीतरी उत्पन्न मिळेल. मात्र, आंब्याचे फळ परिपक्व होत असतानाच उष्णतेची लाट आली आहे. उष्णता वाढल्याने आंब्याला ताण बसल्याने फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. बदलते वातावरण, अति उष्णता यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे. तसेच, या आंबा पिकाचा विमा काढलेला असल्याने विमा कंपन्यांनीही याकडे लक्ष द्यावे. या नुकसानाची पाहणी करून विम्याच्या माध्यमातून सहकार्य करावे, अशी मागणी शेतकरी करत आहे.

आंब्याला डाग पडायला लागतात

सध्या काजूचा भाव गडाडला आहे. आंबा, काजूच्या बागेतून शेतकऱ्यांचे वर्षांचे गणित अवलंबून असते. मात्र, यावर्षाची आर्थिक घडी विसकटल्याने मुलांचे शिक्षण, घरखर्च कसा भागणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. शासनाने याकडे लक्ष देऊन मार्ग काढावा, विमा कंपन्यानी नुकसान भरपाई द्यावी अथवा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलतील, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. उष्णता वाढल्याने आंब्यामध्ये साका तयार होतो. आंब्याला डाग पडायला लागतात. मोठ्या प्रमाणात फळगळ होते. त्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान होत आहे.

हेही वाचा - Rajvadi Kathi Holi Special : सातपुड्याच्या कुशीत रंगली राजवाडी होळी; लाखो समाज बांधवांनी घेतला सहभाग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.