महाराष्ट्र

maharashtra

Sushma Andhare: नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात सुषमा अंधारे, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना प्रतिबंधात्मक नोटिसा

By

Published : Nov 21, 2022, 10:36 PM IST

Sushma Andhare
नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात सुषमा अंधारे, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना प्रतिबंधात्मक नोटिसा ()

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या कणकवलीतील सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या कणकवलीतील सर्व नेत्यांना प्रतिबंधात्मक नोटीसा (Prohibitory Notices to ShivSainiks) पोलिसांनी बजावल्या आहेत. अंधारे यांची नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात सभा होत असल्याने कणकवलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग:शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या सध्या राज्यभर सभा सुरू आहेत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने अंधारे या राज्यभर सभेच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यावर सडकून टीका करत आहेत. सुषमा अंधारे यांनी आपल्या शैलीतून आतापर्यंत अनेक नेत्यांचा समाचार घेतला आहे. कोकणातील भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्यावर देखील त्यांनी आपल्या सभेमधून वेळोवेळी टीका केली आहे.

कणकवलीत मोठा पोलीस बंदोबस्त अंधारे यांची नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यात सभा होत असल्याने कणकवलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकाऱ्यांनी कणकवली पोलीस निरीक्षकांची भेट घेतल्याचे समजते. अंधारे यांनी आपल्या नेतृत्वावर टीका केली तर आम्ही ते सहन करणार नाही अशी भूमिका देखील भाजपा पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसमोर मांडल्याची माहिती समोर येत आहे.

जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच मनाई आदेश लागू केले आहेत. तर कणकवलीमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आज सोमवारी कणकवलीत होणाऱ्या अंधारे यांच्या सभेच्या निमित्ताने सभेपूर्वीच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, युवा नेते संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक यांच्यासह कणकवली आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांना सी.आर.पी.सी.149 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला असून त्याचा भंग होऊ नये अशा सूचना या नोटीसीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता देखील लागू असून त्याचाही भंग होता कामा नये अशा सक्त सूचना या नोटीसीच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

कणकवली राजकीयदृष्ट्या संवेदनशील सुषमा अंधारे यांच्या सभेच्या निमित्ताने कणकवलीत 54 पोलीस कर्मचारी आणि 11 पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय कांबळे आणि कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सभेच्या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दंगल नियंत्रण पथक देखील सज्ज ठेवण्यात आले असून अखेरच्या क्षणी ते देखील कणकवली तैनात करण्यात येऊ शकते अशी माहिती पोलीस सूत्राने दिली आहे. कणकवली कणकवली हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहर असल्याने या ठिकाणी प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. सुषमा अंधारे या कणकवलीत आल्यानंतर कणकवली एसटी बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणावरून रॅलीने त्या पाचशे मीटर अंतरावर असलेल्या सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत .

ABOUT THE AUTHOR

...view details