महाराष्ट्र

maharashtra

गणोशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांनो लसीचे दोन डोस घेतले असतील बिनधास्त जा - मंत्री सामंत

By

Published : Sep 2, 2021, 8:48 PM IST

v

एकीकडे कोरोना तिसऱ्या लाटेची भीती असताना दुसरीकडे अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लगबग सुरू झाली असून कोकणात जाण्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना, आरटीपीसीआर प्रमाणपत्राची बंधने असणार नाही. मात्र, ज्या प्रवाशांनी दोन डोस पूर्ण केले नसतील अशा व्यक्तीची कोकणात प्रवेश करताना कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. नुकताच यासबंधीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई/सिंधुदुर्ग - एकीकडे कोरोना तिसऱ्या लाटेची भीती असताना दुसरीकडे अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना लगबग सुरू झाली असून कोकणात जाण्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना, आरटीपीसीआर प्रमाणपत्राची बंधने असणार नाही. मात्र, ज्या प्रवाशांनी दोन डोस पूर्ण केले नसतील अशा व्यक्तीची कोकणात प्रवेश करताना कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. नुकताच यासबंधीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

बोलताना मंत्री सामंत

शासनाच्या निर्णयाचा प्रवासी संघटनाकडून विरोध

यावर्षी 10 सप्टेंबरला गणेशोत्सव असल्याने कोकणवासियांना कोकणात जाण्याची ओढ लागली आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाता न आलेल्या चाकरमानी यंदा खूप हौसेने कोकणात जाण्यासाठी तयारीला लागला आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. मात्र, यंदा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी म्हणून गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या नागरिकांनासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशाला आरटीपीसीआर प्रमाणपत्राची बंधनकारक नसणार आहे. तथापि ज्या प्रवाशांनी किंवा व्यक्तीचे दोन डोस पूर्ण केले नसतील अशा व्यक्तींची जिल्ह्यात प्रवेश करताना कोरोना चाचणी करण्यात येईल. चाचणीमध्ये ज्या व्यक्ती कोरोना बाधित आढळतील त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने विरोध केला आहे.

रेल्वे स्थानकांवर चार रांगा - उदय सामंत

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, गतवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही कोरोनाचे सावट असल्याने कोकणात येणाऱ्या प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. गर्दी होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे. आम्हाला विश्वास आहे की नागरिक प्रशासनाला सहकार्य करतील. रेल्वे गाड्यातून जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशासाठी रेल्वे स्थानकात उतरल्यावर तीन ते चार रांगा करून प्रत्येकाला स्थानकाबाहेर जायचे आहे. यामध्ये एका रांगेत कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या चाकरमान्यांसाठी, दुसरी रांग 18 वर्षांखालील तरूण, बालकांसाठी, तिसऱ्या रांगेत आरटीपीसीआर चाचणी केलेल्यासाठी आणि चौथी रांग कोणतीही चाचणी किंवा कोरोनाचे डोस न घेतलेल्यांसाठी करण्यात येणार आहे.

...अन्यथा रेल्वे रोको आंदोलन

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीचा कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाने जाहीर निषेध केला आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र किंवा लसीकरणाचे दोन डोस झाल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या मार्गातील हा अडथळा आहे. हा अडथळा तात्काळ दूर करावा दूर करावा, येत्या 5 सप्टेंबरपर्यंत नियम शिथिल न केल्यास 6 सप्टेंबरला रेल रोको आंदोलन करू, असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख राजू कांबळे यांनी प्रशासनाला दिला आहे.

काय आहेत नियम..?

  • ज्या चाकरमान्यांचे कोरोना लसीचे दोन डोस झाले, त्यांना कोकणात प्रवेश खुला असेल.
  • 18 वर्षांखालील तरूण, बालकांना कोरोनाची लस नसल्याने त्यांनाही कोकणात प्रवेश असेल.
  • 72 तासांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी केलेले प्रमाणपत्र असल्यास त्या चाकरमान्यांनाही कोकणात प्रवेश दिला जाईल.
  • ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस किंवा आरटीपीसीआर चाचणी केली नसेल, त्यांची जिल्ह्यांच्या सीमेवर त्वरीत कोरोना चाचणी केली जाईल. त्यानंतर अहवाल निगेटिव्ह आल्यास तत्काळ जिल्ह्यात प्रवेश दिला जाईल.
  • या कोरोना चाचणीत चाकरमान्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास, त्याला कोकणात प्रवेश करता येणार नसून संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केले जाईल.

हेही वाचा -पोलिसांसमोर अनुपस्थितीसाठी वकिलांनी दिले प्रकृती अस्वास्थ्याचे कारण; अन् राणे विमानातून दिल्लीला रवाना!

ABOUT THE AUTHOR

...view details