महाराष्ट्र

maharashtra

'बेंबीच्या देठापासून ओरडण्यापेक्षा केंद्राकडून निधी आणावा'

By

Published : May 23, 2021, 8:35 PM IST

Updated : May 23, 2021, 9:48 PM IST

पंतप्रधान मोदींनी तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसानीची गुजरात येथील पाहणी करताना विमानातून जमिनीवरही उतरले नाहीत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या ठिकाणी येऊन स्वतः लोकांशी संवाद साधला आहे, असे म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला आहे.

नाना पटोले
नाना पटोले

सिंधुदुर्ग- तौक्ते चक्रीवादळात कोकणातील झालेले नुकसान पाहता येथील लोकांच्या दुःखाचे निराकरण करता यावे म्हणून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. असे सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी लक्षात घ्यावे पंतप्रधान नुकसानीची पाहणी करताना विमानातून जमिनीवरही उतरले नाहीत. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी स्वतः लोकांशी संवाद साधला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी बेंबीच्या देठापासून राज्य सरकारवर टीका करण्यापेक्षा पंतप्रधानांना भेटून केंद्राकडून आपत्ती व्यवस्थापनाचे पैसे केंद्राकडून आणले तर त्यांना शाबासी देऊ, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधकांना लगावला.

बोलताना नाना पटोले

राज्यपालांनी 12 आमदारांच्या यादीला मान्यता द्यावी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सिंधुदुर्गात नुकसानग्रस्त भागाची रविवारी (दि. 23 मे) पाहणी केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुद्धा टीका केली. पटोले यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरही निशाणा साधला. राज्यपाल राज्याचे प्रमुख आहेत. जर आमचे काय चुकले असेल तर त्यांनी सांगणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, अशाप्रकारे 12आमदारांची यादी दाबून ठेवणे योग्य नाही. मुंबईचे राज्यपाल कार्यालय हे भाजपचे कार्यालय झाले आहे. हे होता कामा नये, कारण राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. त्याला सगळ्यांचे कान ओढण्याचा अधिकार असतो. पण ज्या क्षेत्रातील लोकांची यादी जेव्हा मंत्रीमंडळाने निर्णय घेऊन राज्यपालांकडे पाठविली जाते तेव्हा राज्यपालांनी त्यावर विचार करायला हवा. एखादी व्यक्ती त्या क्षेत्रातील नसेल तर सरकारला सांगायला हवे. पण, ते दाबून बसणे आणि त्या क्षेत्रातील प्रतिनिधीला संपवणे ही भूमिका चुकीची आहे. म्हणून राज्यपालांना विनंती आहे की या सर्व प्रकरणावर पडदा पाडावा आणि ज्या 12 आमदारांची नावे पाठवली त्यांना मान्यता द्यावी.

केंद्राकडून महाराष्ट्राला 2 हजार कोटी मिळतील अशी आमची अपेक्षा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातची हवाई पाहणी केली, पण महाराष्ट्राची केली नाही. ते देशाचे प्रधानमंत्री आहेत. अस म्हणत पटोले यांनी टीका केली. त्यामुळे गुजरातला 1 हजार कोटी दिले तर महाराष्ट्राला 2 हजार कोटी मिळतील, अशी आमची अपेक्षा आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या अंतर्गत संविधानिक अधिकार हे त्या राज्याच्या जनतेचे आहेत. केंद्र सरकार मदत देणार म्हणजे उपकार करणार असे नाही. मोदींची महाराष्ट्रावर वक्रदृष्टी आहे की प्रेम याच अजून दर्शन झालेले नाही. महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झाले आहे, जो महाराष्ट्राचा वाटा आहे, जस तातडीने विमानामधून गुजरातला फिरून 1 हजार कोटी रुपये दिलेत तसाच एक हवाई दौरा महाराष्ट्रात करून तातडीने 2 हजार कोटी द्यावेत,अशी विनंती मोदींना असल्याचे पटोले यावेळी म्हणाले.

पंतप्रधान केअर फंडातून देण्यात आलेले व्हेंटिलेटर नादुरुस्त

पंतप्रधान केअर फंडातून देण्यात आलेले व्हेंटिलेटर नादुरुस्त आहेत. म्हणजे प्रधानमंत्र्याच्या कार्यालयातूनचे भ्रष्टाचार सुरू झालेला असल्याचे दिसते. कोरोनाचा फायदा घेऊन सामान्य जनतेची लूट झालेली आहे हे मान्य आहे. केईएममध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे, त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येईल, असेही नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा -सिंधुदुर्ग : पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमोर जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिकांनी मांडले गाऱ्हाणे

Last Updated :May 23, 2021, 9:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details