महाराष्ट्र

maharashtra

9 वर्षांपूर्वी अल्पवयीन असताना बलात्कार झाल्याची महिलेची तक्रार; महाबळेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल

By

Published : Oct 20, 2021, 6:58 PM IST

महाबळेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने 9 वर्षापूर्वी अल्पवयीन असताना बलात्कार झाल्याची तक्रार दिली आहे. त्यात महिलेने म्हटले आहे, की 2012 मध्ये अल्पवयीन असताना गौरांग कालीपोदो पाल (रा. महाबळेश्वर) याने इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध ठेवले. यासाठी वेळोवेळी धमकी देवून मारहाण व शिवीगाळदेखील करण्यात आली.

महाबळेश्वर पोलीस
महाबळेश्वर पोलीस

सातारा - महाबळेश्वर येथे नऊ वर्षांपुर्वी अल्पवयीन मुलीवर घडलेल्या अत्याचाराचे प्रकरण महाबळेश्वर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. पीडित अल्पवयीन मुलीने सज्ञान झाल्यावर पोलिसांत तक्रार दिली. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे महाबळेश्वर पोलिसांनी दोन महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.


महाबळेश्वर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेने 9 वर्षापूर्वी अल्पवयीन असताना बलात्कार झाल्याची तक्रार दिली आहे. त्यात महिलेने म्हटले आहे, की 2012 मध्ये अल्पवयीन असताना गौरांग कालीपोदो पाल (रा. महाबळेश्वर) याने इच्छेविरूद्ध शारीरिक संबंध ठेवले. यासाठी वेळोवेळी धमकी देवून मारहाण व शिवीगाळदेखील करण्यात आली. या अत्याचारातून गरोदर राहिले असता पुण्यातील रुग्णालयात नेऊन गर्भपातदेखील करण्यात आला. अत्याचार करणाऱ्याला आरती गौरांग पाल व इंदुबाई सुरेश सपकाळ (रा सुमन काॅटेज वेण्णालेक जवळ) यांनी वेळोवेळी मदत केल्याचेही पीडित महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.

हेही वाचा-गोवा बनावटीचा लाखों रुपयांचा मद्यसाठा सोलापुरात जप्त; चार संशयित आरोपींना ठोकल्या बेड्या

पोक्सो अंतर्गत गुन्हा-

महिलेच्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलिसांनी गोरंग पाल, आरती पाल व इंदुबाई सपकाळ या तिघांविरोधात बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा-औरंगाबादेत क्रूरतेचा कळस: बिडकीन तालुक्यात चार दरोडेखोरांचा दोन महिलांवर सामूहिक बलात्कार

पोक्सो कायद्याचे महत्त्व

पोक्सो कायदा २०१२ मध्ये लागू करण्यात आला आहे. लैंगिक अत्याचाराला मुलगाही बळी पडू शकतो असे कायद्यात गृहित धरण्यात आले. मुलांवर लैंगिक अत्याचार होऊ शकतो याबद्दल भारतीय दंड संहिता मानत नाही. त्यामुळे पोक्सो कायद्याची गरज जाणवते.


हेही वाचा-मैत्रिणीसोबत कारमधून जाणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला करून लुटणारे गजाआड


पोक्सो कायद्यामुळे मुलांवरील लैंगिक गुन्ह्यांची व्याप्तीही वाढली आहे. लैंगिक अत्याचाराची व्याख्या नॉन-इंट्रॅक्टिव लैंगिक अत्याचार तसेच तीव्र भेदक लैंगिक अत्याचार (कलम 3 ते 10) समाविष्ट करत आरोपींना शिक्षेचा समावेश आहे. त्यात जन्मठेप तसेच फाशीचाही समावेश आहे. या कायद्याप्रमाणे मुलाचा लैंगिक छळ ज्यामध्ये स्पर्श असो आणि पाठलाग करणे हे कलम 11 आणि 12 प्रमाणे शिक्षेस पात्र आहे. पोक्सो कायदा कलम 13 अंतर्गत मुलांना लैंगिक अत्याचार सामग्री म्हणजे पोर्नोग्राफीचा वापर करणे अशा प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा पोक्सो कायद्याअंतर्गत देण्याची तरतूद आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details