महाराष्ट्र

maharashtra

Koyna Dam: कोयना धरणाचे दोन दरवाजे उघडले

By

Published : Oct 8, 2022, 1:21 PM IST

धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे (Koyna Dam) दोन दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले आहेत. (Koyna Dam gates opened). सध्या जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार कोसळत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली आहे.

Koyna Dam
Koyna Dam

सातारा: धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे (Koyna Dam) दोन दरवाजे १ फुटाने उघडण्यात आले आहेत. (Koyna Dam gates opened). धरणाच्या दरवाजा आणि पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद ४२०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणात १०४.९३ टीएमसी पाणीसाठा आहे. सततच्या पावसामुळे धरणात प्रतिसेकंद ६१२५ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

परतीच्या पावसामुळे धरणात आवक वाढली:सध्या जिल्ह्यात परतीचा पाऊस जोरदार कोसळत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. हवामान खात्याने वर्तवलेला पाऊस आणि पाण्याची आवक पाहता धरण व्यवस्थापनाने धरणाचे दोन दरवाजे उघडून विसर्ग सुरू केला आहे. पायथा वीज गृह कार्यान्वित करण्यात आले आहे. दोन दरवाजातून ३१५४ क्युसेक आणि पायथा वीजगृहातून १०५०, असा एकूण ४२०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details