महाराष्ट्र

maharashtra

Satara Police arrest Gunaratna Sadavarte : ऑर्थर तुरुंगानंतर गुणरत्न सदावर्ते यांचा साताऱ्यातील तुरुंगात मुक्काम? न्यायालयात आज करणार हजर

By

Published : Apr 14, 2022, 12:50 PM IST

बुधवारी गिरगाव न्यायालयाने ( Girgaon court Gunratna Sadavarte case ) गुणरत्न सदावर्ते यांना साताऱ्यात गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यात सातारा पोलिसांच्या स्वाधिन करण्याचे आदेश दिले होते. तथापि, कायदेशिर प्रक्रीया पुर्ण न झाल्याने सदावर्ते यांची रवानगी आर्थर तुरुंगामध्ये करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी सातारा पोलिसांचे एक पथक आर्थर तुरुंगामध्ये ( Satara Police arrest Gunaratna Sadavarte ) पोहचले.

गुणरत्न सदावर्ते अटक
गुणरत्न सदावर्ते अटक

सातारा- एसटी कर्मचाऱ्यांना हिंसा करण्यासाठी चिथावणी देण्याचा आरोप असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी गुरुवारी आर्थर तुरुंगामधून ताब्यात घेतले. पोलीस हे साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. पोलीस पथक वेळेत साताऱ्यात पोहचले तर आजच सदावर्ते यांना न्यायालयापुढे ( Gunaratna Sadavarte in Satara court ) हजर करण्यात येणार आहे.

पोलीस साताऱ्याकडे रवाना-बुधवारीगिरगाव न्यायालयाने ( Girgaon court Gunratna Sadavarte case ) गुणरत्न सदावर्ते यांना साताऱ्यात गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यात सातारा पोलिसांच्या स्वाधिन करण्याचे आदेश दिले होते. तथापि, कायदेशिर प्रक्रीया पुर्ण न झाल्याने सदावर्ते यांची रवानगी आर्थर तुरुंगामध्ये करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी सातारा पोलिसांचे एक पथक आर्थर तुरुंगामध्ये ( Satara Police arrest Gunaratna Sadavarte ) पोहचले. कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर सातारा पोलीस सदावर्ते यांना ताब्यात घेऊन साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले आहे

सायंकाळी हजर करणार-आज सायंकाळपर्यंत हे पथक साताऱ्यात पोहचण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामकाजाच्या वेळेत पथक साताऱ्यात पोहोचल्यास आजच न्यायालयापुढे हजर करण्यात येईल, असे साताऱ्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले.

काय आहे आरोप -मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने गुणरत्न सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती व सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल, असे ते वक्तव्य असल्याने गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात सातारा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा-Gunaratna Sadavarte Custody : गुणरत्न सदावर्तेंचा ताबा सातारा पोलीस घेणार

हेही वाचा-Gunaratna Sadavarte Arrest : गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ
हेही वाचा-Anil Parab : गुणरत्न सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे गोळा केले - अनिल परब


ABOUT THE AUTHOR

...view details