ETV Bharat / city

Gunaratna Sadavarte Arrest : गुणरत्न सदावर्ते यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांनी वाढ

author img

By

Published : Apr 11, 2022, 7:09 PM IST

अॅड. घरत ( Adv Gharat in Gunaratn Sadavarte ) म्हणाले, की पाच महिन्यांपासून एसटीच्या सरकारमध्ये विलिनिकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलकांकडून कोर्टात केस लढणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 530 रुपये प्रमाणे एकूण 1.80 कोटी रुपये ( Gunaratn Sadavarte money collection ) गोळा केले आहेत.

गुणरत्न सदावर्ते
गुणरत्न सदावर्ते

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ( ST employees silver oak attack ) एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवार 8 एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्यात प्रकरणात 109 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. तसेच या प्रकरणात एसटी कामगार संघटनेचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनादेखील अटक करण्यात आली होती. आज गिरगाव न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे. वकील सदावर्ते हे 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ( Advocate Sadavarte Police custody ) राहणार आहे.


अॅड. घरत ( Adv Gharat in Gunaratn Sadavarte ) म्हणाले, की पाच महिन्यांपासून एसटीच्या सरकारमध्ये विलिनिकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलकांकडून कोर्टात केस लढणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी या प्रत्येक कर्मचाऱ्याकडून 530 रुपये प्रमाणे एकूण 1.80 कोटी रुपये गोळा केले आहेत.

हल्ल्याच्या घटनेनंतर सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्यांना दोन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली होती. त्यांच्या कोठडीचा कालावधी आज संपल्याने त्यांना गिरगावच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीदरम्यान सरकारी वकील आणि सदावर्ते यांच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तीवाद झाला. यावेळी सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून 1.80 कोटी रुपये जमविल्याचे सांगितले. पण, यावर उत्तर देताना सदावर्तेंचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी म्हटले की, पैसे घेतल्याप्रकरणी एकाही कर्मचाऱ्याने तक्रार दिलेली नाही. मग, या मुद्द्याचे प्रयोजन काय?

दरम्यान 8 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या मुंबईचे निवासस्थान सिल्व्हर ओक येथे आंदोलक कर्मचाऱ्यांनी दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. यावेळी हे कर्मचारी मोठ्या प्रमाणावर प्रक्षुब्ध झाले होते. अनेकजण यावेळी पवारांना आक्षेपार्ह शब्दांत बोलत होते. या प्रकाराचे मोठ्या प्रमाणावर राजकीय पडसाद उमटले होते. याप्रकरणी कर्मचाऱ्यांना उचकवल्याबद्दल अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली होती.

हेही वाचा-Minister RK Singh Surrendered : केंद्रीय मंत्री आर के सिंह यांचे न्यायालयात आत्मसमर्पण

हेही वाचा-Satara Police Gunaratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांचा सातारा पोलीस ताबा मागणार; जुन्या गुन्ह्याचा होणार तपास

हेही वाचा-Kirit Somaiya Bail Rejected : किरीट सोमैयांना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता; अटकपूर्व जामीन फेटाळला




ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.