सातारा: Satara Crime News : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला जेरबंद करत घरफोडीचे १६ गुन्हे उघडकीस (Satara Crime) आणले आहेत. तपासादरम्यान, आरोपीने एका दरोड्याची देखील कबुली दिली असून या सर्व गुन्ह्यातील सोन्या-चांदीचे दागिने मिळून तब्बल ४० लाख ३५ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. एलसीबीची (LCB Action In Satara) आतापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी ठरली आहे.
पोलिसांनी पाठलाग करून आरोपीला पकडले : सातार्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी एलसीबीच्या पथकाला जिल्ह्यातील घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले होते. पोलीस रेकॉर्डवरील सराईत आरोपी महेश उर्फ म्हावडया मंगेश काळे याने कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकल्याची माहिती, पोलीस निरीक्षक देवकर यांना खबर्याकडून मिळाली. पोलिसांनी फलटणमधील नाना पाटील चौकात पाठलाग करून पकडले.
सराईत आरोपीकडून 16 गुन्ह्यांची उकल : पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपी महेश काळे याने दरोडा आणि घरफोडीच्या 16 गुन्ह्यांची कबुली दिली. तसेच ऋतुराज भावज्या शिंदे, कोहिनूर जाकिर काळे, चंदेक लक्ष्मण शिंदे, राजश्री वंदेक शिंदे, अभय काळे, अतिक्रमण काळे यांच्या मदतीने दरोडा टाकल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात महेश काळे आणि ऋतुराज भाज्या शिंदे यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने महेश काळेला ६ दिवस आणि ऋतुराज शिंदेला ५ दिवस पोलीस कोठडी सुनावली.