महाराष्ट्र

maharashtra

साताऱ्यातील 'त्या' घटनेमागे मोठे कट-कारस्थान; उच्च स्तरीय चौकशी करा -  उदयनराजे भोसले

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2023, 9:12 PM IST

Updated : Aug 22, 2023, 9:44 PM IST

साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तसेच देशाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढण्याची गरज आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे मोठे कट-कारस्थान या घटनेच्या पाठीमागे आहे. त्यामुळे या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

MP Udayanaraje Bhosale
खासदार उदयनराजे भोसले

प्रतिक्रिया देताना खासदार उदयनराजे भोसले

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाबद्दल मोबाईलवर आक्षेपार्ह भाषेतील स्टेटस ठेवल्याचे कृत्य लांच्छनास्पद आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे मोठे कट-कारस्थान या घटनेच्या पाठीमागे आहे. त्यामुळे या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून तेढ निर्माण करणारी प्रवृत्ती ठेचून काढा, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे.



धमकी आलेल्यांना संरक्षण नाही : या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांनी विस्तृत खुलासा करावा. संशयित मुलाच्या घराला पोलिसांनी संरक्षण दिले, परंतु धमकीचे मेसेज आलेल्यांना कसलेही संरक्षण दिलेले नाही, हा मोठा विरोधाभास असल्याचे उदयनराजेंनी पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून दिले.



अपप्रवृत्ती ठेचून काढा :समाज स्वास्थ्याला धक्का लागू नये, यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोतच. तथापि, अशी अपप्रवृत्ती प्रशासनाने वेळीच ठेचून काढली पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनासाठी जमलेल्यांपैकी काही जणांना पाकिस्तानामधून धमकीचे मेसेज आले. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये काही लागेबांधे आहेत का? याचाही तपास करून देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहीजेत, अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे.

साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तसेच देशाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढण्याची गरज आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याचे मोठे कट-कारस्थान या घटनेच्या पाठीमागे आहे. त्यामुळे या घटनेची उच्च स्तरीय चौकशी करा. -उदयनराजे भोसले, खासदार



घटनेशी संबंधित सर्वांनाच ताब्यात घ्या : सर्वधर्म समभावाचा पाया रचणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलेल्या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करतो. या प्रकारातील सत्य सामारे येण्यासाठी संबंधित मुलाला कोणी प्रोत्साहन दिले, मदत केली. या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे, याची माहिती त्या मुलाकडूनच मिळणार आहे. त्यामुळे या संबंधित सर्वांनाच ताब्यात घेवून सखोल चौकशी झाली पाहीजे, असे उदयनराजेंनी निवेदनात म्हटले आहे.

अल्पवयीन संशयितास पोलिसांनी घेतले ताब्यात: 18 ऑगस्ट रोजी, सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात सातारा शहर पोलीस ठाण्यात भा. द. वि. कलम २९५ (अ), १५३ (ब), ५०४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अल्पवयीन संशयिताने छत्रपती शिवाजी महाराज, देशाबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले होते. त्यामुळे अल्पवयीन संशयितास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा -

  1. Aditi Swami Archery Championship: आदितीने देशाच्या लौकिकाला चार चाँद लावले- खासदार उदयनराजे भोसले
  2. Udayanraje Bhosale : अजितदादांना शुभेच्छा दिल्या का?, पाहा उदयनराजे काय म्हणाले..
  3. Election War Video : साताऱ्यातून उदयनराजेंविरोधात लढण्याचे रामराजे निंबाळकरांचे संकेत, पाहा व्हिडिओ
Last Updated :Aug 22, 2023, 9:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details