ETV Bharat / state

Aditi Swami Archery Championship: आदितीने देशाच्या लौकिकाला चार चाँद लावले- खासदार उदयनराजे भोसले

author img

By

Published : Aug 6, 2023, 1:24 PM IST

Updated : Aug 6, 2023, 2:11 PM IST

Udayanraje Bhosale Reaction
उदयनराजे भोसले यांची आदिती स्वामीवर प्रतिक्रिया

भारताला जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक पटकावून सातार्‍याच्या आदिती स्वामीने यश मिळविले आहे. देशाच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कामगिरी आहे. तिने देशाच्या लौकिकाला चार चाँद लावले आहेत, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आदितीच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. तसेच आदिती आणि तिच्या आई-वडिलांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

सातारा : साताऱ्याची तिरंदाज आदिती स्वामी अवघ्या 17 व्या वर्षात वर्ल्ड चॅम्पियन बनली आहे. जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात तिने शनिवारी सामन्याच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेरा हिला पराभूत केले. अँड्रियाला पराभूत करत आदितीने सीनियर वर्ल्ड चॅम्पियनचे शीर्षक तिच्या आपल्या नावावर केले. वैयक्तिक सुवर्णपदक पटकावल्यानंतर साताऱ्याच्या गोल्डन गर्ल आदिती स्वामीवर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. तिच्या पालकांचे अभिनंदन करण्यासाठी घरी मान्यवरांची रिघ लागली आहे. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले आहे.


सातार्‍याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साह : आदितीने ज्युनियर स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत बर्लिनमधील जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या कंपाऊंड महिलांच्या अंतिम फेरीत मेक्सिकोच्या अँड्रिया बेसेराला पराभूत करून तिने विश्वविजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत अँड्रिया बेक्वेरा हिचा आदितीने (149-147) असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. 17 वर्षीय आदिती स्वामी ही वैयक्तिक स्पर्धेत जागतिक स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय तिरंदाज ठरली आहे. तिच्या यशानंतर देशासह सातार्‍यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. आदितीच्या यशामुळे देशाच्या पदक तक्त्यास आणि देशाच्या लौकीकास चार चाँद लागले आहे, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील विजयाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले आहे.

सातारकरांची छाती अभिमानाने फुलली : आदिती स्वामी हिने सातार्‍याचे नाव जागतिक पटलावर झळकविले. आहे त्यामुळे सर्व सातारकरांचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. सातारकर आदितीवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तिच्या आई-वडीलांवर देखील अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. आदितीचे वडील हे युगपुरूष शिवाजी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, कण्हेर येथे शिक्षक आहेत, तर आई ग्रामसेविका आहे. आदितीने सुवर्णपदक पटकावताच सातार्‍यातील मंगळवार पेठेसह संपुर्ण शहरात जल्लोष करण्यात आला. जुलैमध्ये लिमेरिक येथे झालेल्या 18 वर्षांखालील यूथ चॅम्पियनशिप स्पर्धेत आदितीने 150 गुणांपैकी 149 गुण मिळवले होते.

हेही वाचा :

  1. World Archery Championship: भारताचा 'सुवर्ण' नेम; साताऱ्याची लेक अदिती 17 व्या वर्षीच बनली जागतिक चॅम्पियन, पंतप्रधानांकडून कौतुक
  2. KIYG 2021: महाराष्ट्राच्या आदिती स्वामीने तिरंदाजीमध्ये पटकावले सुवर्णपदक
Last Updated :Aug 6, 2023, 2:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.