महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat Impact : प्रीतिसंगम उद्यानात प्रचार सभा घेणाऱ्यांवर नगरपालिका करणार गुन्हा दाखल

By

Published : Dec 29, 2022, 10:38 PM IST

निवडणूक प्रचाराचा शुभारंभ, प्रचार सभा ( Patan Taluka Teachers Society Election ) चक्क प्रीतिसंगम उद्यानात ( Pritisangam Park ) घेतल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रसिद्ध करताच कराड नगरपालिका ( Karad Municipality ) प्रशासन खडबडून जागे झाले. उद्यानातील कर्मचाऱ्यांकडून अहवाल प्राप्त होताच प्रचार सभा घेणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा दाखल ( case filed against teacher ) केला जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली आहे.

case filed against teacher
शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

प्रीतिसंगम उद्यानात प्रचार सभा घेणाऱ्यांवर गुन्हा

सातारा - कराड-पाटण तालुका शिक्षक सोसायटीच्या निवडणूक ( Patan Taluka Teachers Society Election ) प्रचाराचा शुभारंभ, प्रचार सभा चक्क प्रीतिसंगम उद्यानात ( Pritisangam Park ) घेतल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रसिद्ध करताच कराड नगरपालिका प्रशासन ( Karad Municipality ) खडबडून जागे झाले. उद्यानातील कर्मचाऱ्यांकडून अहवाल प्राप्त होताच प्रचार सभा घेणाऱ्या शिक्षकांवर गुन्हा दाखल ( case filed against teacher ) केला जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी दिली आहे.

शिक्षकांकडून मनाई आदेशाचा भंग -दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात चव्हाण साहेबांच्या जयंती, पुण्यतिथी व्यतिरिक्त वैयक्तिक अथवा सार्वजनिक तसेच राजकीय कार्यक्रमास मनाई आहे. हे सर्वश्रुत असताना देखील शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी कराड-पाटण तालुका शिक्षक सोसायटी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. खुर्च्या मांडून, सतरंज्या अंथरूण प्रचार सभाही घेतली. या संदर्भातील वृत्त ईटीव्ही भारतने प्रसिद्ध करताच नगरपालिका वर्तुळात खळबळ उडाली. तसेच यशवंतप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गुरूजन पॅनेलचे नेते अडचणीत - मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या कराड-पाटण शिक्षक सोसायटीच्या निवडणुकीसाठी गुरूजन आणि गुरूमाऊली या दोन पॅनेलमध्ये लढत होत आहे. यातील गुरूजन पॅनेलमध्ये शिक्षकांच्या दहा संघटना एकत्र आल्या आहेत. राज्यातील शिक्षकांचे नेतृत्व करणाऱ्यांना निवडणुकीच्या धुंदीत नियमांचा विसर पडला आणि ते आगळीक करून बसले. शिक्षकांनीच प्रीतिसंगमाचा राजकीय आखाडा करून टाकला.

नगरपालिका गुरूजींना शिकवणार कायद्याचा धडा -शिक्षक सोसायटी निवडणुकीची प्रचार सभा प्रीतिसंगम उद्यानात झाल्यामुळे नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. नगरपालिकेचे सुरक्षा रक्षक असताना राजकीय सभा झाल्याने कराडकरांनी आश्चर्य व्यक्त केले. उद्यानातील प्रचार सभेचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच उद्यानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये गुरूजींच्या प्रचाराची सभा चित्रीत झाली आहे. उद्यानातील कर्मचाऱ्यांकडून दोन दिवसात अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details